जगप्रसिद्ध टी२० लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग २०२१चे बिगुल वाजले आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नईत झालेल्या मिनी लिलावाने या आयपीएल हंगामाचा श्रीगणेशा झाला आहे. या लिलावात रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सने एकूण ७ खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी केले.
त्यातही दक्षिण आफ्रिकाचा युवा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनच्या निवडीने सर्वांचे डोळे विस्फारले. अवघ्या २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीला मुंबईने त्याला गोटात सामील केले. त्याच्या येण्याने मुंबईची वेगवान गोलंदाजी फळी अजून जास्त आक्रमक बनली आहे. तसेच त्यांनी मुक्त केलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज नेथन-कूल्टर-नाइलला सर्वाधिक ५ कोटींची बोली लावत विकत घेतले.
एवढेच नव्हे तर, गतवर्षी चेन्नई सुपर किंग्सकडून दमदार गोलंदाजी केलेल्या पियुष चावलावर मुंबईने २ कोटी ४० लाखांची बोली लावली. याव्यतिरिक्त बहुचर्चेत राहिलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरलाही संघात स्थान देण्यात आले. अशाप्रकारे आगामी हंगामात विक्रमी सहावी विजेतेपद मिळवण्याच्या दृष्टीने मुंबईने तगडा संघ उभारला आहे.
आपली #OneFamily 💙#MumbaiIndians #IPLAuction pic.twitter.com/jlKQEmP04F
— Mumbai Indians (@mipaltan) February 18, 2021
मुंबई इंडियन्स – २५ खेळाडू (८ परदेशी)
लिलावाआधी संघात कायम असलेले खेळाडू –
रोहित शर्मा(कर्णधार) , क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे (यष्टीरक्षक), किरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान
लिलावात खरेदी केलेले खेळाडू –
नेथन कुल्टर नाईल (५ कोटी), ऍडम मिल्ने(३.२० कोटी), पियुष चावला(२.४० कोटी), जेम्स निशम(५० लाख), युधविर चरक(२० लाख), मार्को जेन्सन(२० लाख), अर्जुन तेंडूलकर (२० लाख)
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सचे ‘भविष्य’ म्हटले जात असलेला मार्को जेन्सन आहे तरी कोण?
मोठी बातमी: श्रीलंका क्रिकेटला तगडा झटका, १८ शतके करणाऱ्या फलंदाजासह १५ क्रिकेटर सोडणार देश!
आयुष्यभर अर्जुन तेंडूलकरवर ‘या’ गोष्टीचा दबाव असेल; भारतीय दिग्गजाचा खळबळजनक खुलासा