मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर रविवारी (16 एप्रिल) दुपारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढत सुरू होत आहे. चालू आयपीएल हंगामातील हा 22वा सामना असून सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील मुंबई संघाने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून सूर्यकुमारने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार रोहित शर्मा पोटदुखीच्या कारणास्तव या सामन्यात खेळत नाहीये. मागच्या मोठ्या काळापासून आयपीएल पदार्पणाची वाट पाहणाऱ्या अर्जुन तेंडुलकर याला या सामन्यात पदार्पणाचीसंधी मिळाली.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स – ईशान किशन(यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, रितीक शोकीन, पीयुष चावला, डुआन जॅनसेन, रिले मेरेडिथ.
कोलकाता नाईट रायडर्स – रहमनुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नारायन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरूण चक्रवर्ती.
(Mumbai Indians have won the toss and elected to bat first, Suryakumar is the captain of Mumbai in the absence of Rohit Sharma.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘चॅच ऑफ द टूर्नामेंट’साठी राहुलची दावेदारी! पंजाबच्या फलंदाजाला तंबूत धाडण्यासाठी मोरली मोठी डाईव्ह
सेंट्रेल कॅन्ट्रॅक्ट नसले तरीही बीसीसीआय ‘या’ खेळाडूवर खर्च करणार, शस्त्रक्रियेसाठी आरसीबीचा फलंदाज इंग्लडला जाणार