---Advertisement---

अटीतटीच्या सामन्यात टॉसचा निकाल मुंबईच्या बाजूने, रोहितसेना हैदराबादला करणार का चीतपट?

On: रविवार, मे 21, 2023 3:05 PM
Rohit-Sharma-And-Aiden-Markram
---Advertisement---

मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल 2023चा 69वा सामना रविवारी (दि. 21 मे) खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर 3.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात 3 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक जिंकत मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना मुंबईसाठी जिंकणे खूप महत्त्वाचा आहे. मात्र, हैदराबाद मुंबईला सामना जिंकू देतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात महत्त्वाचा बदल आहे. ऋतिक शोकीन संघातून बाहेर पडला असून त्याच्या जागी कुमार कार्तिकेय याची एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघातही काही बदल आहेत. उमरान मलिक याचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच, विव्रांत शर्मा हादेखील संघात परतला आहे आणि अभिषेक शर्मा हा बाहेर पडला आहे. अभिषेकला सब्स्टिट्यूट खेळाडूंमध्ये ठेवले आहे.

हंगामातील कामगिरी
मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेत आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामने त्यांनी जिंकले आहेत, तर उर्वरित 6 सामन्यात त्यांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. यासह ते गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहेत. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद संघाने 13 सामने खेळताना 4 सामने जिंकले आहे, तर 9 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. 4 विजयामुळे 8 गुणांसह ते गुणतालिकेत दहाव्या स्थानी आहेत. आता हा सामना जिंकत हैदराबाद मुंबईच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळवतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Mumbai Indians have won the toss and have opted to field Sunrisers Hyderabad)

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, नेहाल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल

सनरायझर्स हैदराबाद
मयंक अगरवाल, विव्रांत शर्मा, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023चा 70वा सामना RCBसाठी खूपच महत्त्वाचा, फाफसेना काढणार गुजरातचा काटा? पाहा संभावित Playing XI
टीम इंडियातील रिंकूच्या निवडीविषयी सर्वांनी मांडली मतं, पण त्याला काय वाटतंय? वाचून कौतुकच कराल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---