---Advertisement---

हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्समधून सुट्टी? कर्णधारपदाच्या शर्यतीत जसप्रीत बुमराहसह ‘ही’ दोन नावे….

On: बुधवार, जुलै 15, 2026 3:47 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2027 च्या हंगामाआधी मुंबई इंडियन्स संघात मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे. मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी नुकत्याच पार पडलेल्या हंगामाचा अहवाल व्यवस्थापनाकडे सादर केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात एक आढावा बैठक घेतली जाऊ शकते.

या बैठकीत हार्दिक पंड्याबाबत एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या त्याच्या ट्रेडबाबत अनेक वृत्ते समोर येत आहेत. चेन्नई सुपर किंग्जपासून ते कोलकाता नाईट रायडर्सपर्यंतच्या प्रमुख संघांनाही या भारतीय स्टार अष्टपैलू खेळाडूला करारबद्ध करण्यात रस दाखवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सच्या नव्या कर्णधारपदाच्या शर्यतीत जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा आहेत. तिलकच्या तुलनेत बुमराह अधिक अनुभवी असला, तरी त्याच्या दुखापती आणि कामाच्या व्यवस्थापनाचा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यामुळे तिलकसोबत संघ आपला कर्णधार म्हणून निवड करण्याची शक्यता अधिक आहे.

तिलकने इंडिया अ संघाचे नेतृत्व केले असून सध्या तो भारताच्या वरिष्ठ टी २० संघाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याच्याबाबतीत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष असेल.

हार्दिकचे नेतृत्व
हार्दिक २०२४ च्या हंगामात मुंबई इंडियन्समध्ये परतला. त्याआधी त्याने दोन हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात दोनदा अंतिम फेरीत पोहोचला तर एकदा विजेतेपद पटकावण्याचीही कामगिरी केली.

गुजरातने त्यांच्या पहिल्या हंगामात म्हणजे २०२२ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यामधील हार्दिकची कामगिरी पाहून त्याला मुंबईचे नेतृत्व सोपवले गेले होते, मात्र संघाची कामगिरी निराशाजनक झाली.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली पहिल्या हंगामात मुंबई १० व्या स्थानावर तळाशी राहिला. त्यानंतर २०२५ च्या हंगामात दमदार कामगिरी आणि प्लेऑफसाठी पात्रता मिळवली, मात्र ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले. २०२६ मध्ये पुन्हा एकदा संघाची कामगिरी वाईट झाली. या हंगामात पाच वेळेचा चॅम्पियन १४ पैकी केवळ चारच सामने जिंकू शकला.

मुंबईची धक्कादायक कामगिरी पाहून होणाऱ्या बैठकीत कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

एमआयचे शेवटचे विजेतेपद
एमआयने २०२० मध्ये आपले शेवटचे आणि पाचवे विजेतेपद जिंकले होते. ते त्यांचे सलग दुसरे विजेतेपद होते, मात्र गेल्या सहा वर्षांपासून संघाला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. या मोठ्या दुष्काळाची समाप्ती करण्यासाठी मुंबई इंडियन्स नव्या योजना आखण्याच्या तयारीत आहे. (Mumbai Indians update about Captaincy, according to reports Jasprit Bumrah and Tilak varma are in race)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---