---Advertisement---

13 वर्षानंतर चेपाॅकवर मुंबईचा पराभव, विजयासह चेन्नई गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी

On: शनिवार, मे 6, 2023 7:07 PM
Rohit Sharma
---Advertisement---

शनिवारी (6 मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघ आमने सामने आले. उभय संघांतील हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. सीएसकेने आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना पाहुण्या मुंबई इंडियन्सला 6 विकेट्सने पराभूत केले.

उभय संघांतील या सामन्यात नाणेफेकीचा कौल चेन्नई सुपर किंग्जच्या बाजूने लागला. एमएस धोनीने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 139 धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएशकेने 139 धावांचे हे लक्ष्य तीन विकेट्सच्या नुकसानावर आणि 17.4 षटकांमध्ये गाठले. डेवॉन कॉनवे (Devon Conway) या सामन्यातही सीएसकेसाठी सर्वोत्तम प्रदर्शन करणारा फलंदाज ठरला.

सीएसकेला हा सामना जिंकलण्यासाठी शेवटच्या तीन षटकांमध्ये अवघ्या 8 धावा हव्या होत्या. पण सीएसकेच्या फलंदाजांनी 18व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विजय मिळला. एमएस धोनी याने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन संगाला विजय मिळवून दिला. 17व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेवॉन कॉनवे याने विकेट गमावली. कॉनवने सीएसकेसाठी 42 चेंडूत सर्वाधिक 44 धावा केल्या. सीएशकेने कॉनवेच्या रूपात चौथी विकेट गमावल्यानंतर मोईन अली आणि रविंद्र जडेजा यांच्या आधी धोनी खेळपट्टीवर आला. धोनीने 3 चेंडूत 2 धावा करून सीएसकेला विजय मिळवून दिला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स मागच्या 13 वर्षांत पहिल्यांदाच शनिवारी पराभूत झाला. सीएसकेला मोठ्या काळानंतर आपल्या होम ग्राऊंडवर मुंबईविरुद्ध विजय मिळवता आला.

उभय संघींतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मुंबईसाठी सलामीवीर कॅमरून ग्रीन (Cameron Green) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांनी एक आकडी धावसंख्येवर विकेट गमावल्या. नेहमी सलामीला येणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. रोहितने तीन चेंडू खेळून एकही धाव केली नव्हती आणि विकेट गमावली. असे अशले तरी, चौथ्या क्रमांकावर आलेला नेहाल वढेरा याने सर्वाधिक 64 धावांचे योगदिन दिले. सूर्यकुमार यादव आणि स्ट्रिस्टन स्टब्स यांनी अनुक्रमे 26 आणि 20 धावांवर विकेट्स गमावल्या. अर्शदीप सिंगने 1 धाव करून विकेट गमावली. (Mumbai Indians lost the match against Chennai Super Kings)

बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात या तिघांपैकी एक घेणार केएल राहुलची जागा! जाणून घ्या त्यांच्याविषयी  
‘जास्त काही करत नाही, मी फक्त सल्ला देतो…’, राजस्थानला पराभवाची धूळ चारताच पंड्याचे लक्षवेधी वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---