बंगळूरु। गुरुवारी आयपीएल 2019 च्या मोसमातील सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 6 धावांनी विजय मिळवला. मुंबईकडून 3 विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह हा सामनावीर ठरला.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खांद्याला दुखापत झाल्यानंतरही त्यातुन सावरत बुमराहने बेंगलोर विरुद्ध सर्वोत्तम प्रदर्शन केले. त्याने 4 षटकात फक्त 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली, शिमरॉन हेटमेयर आणि कॉलिन डि ग्रँडहोम या तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
बुमराह हा फक्त मुंबई इंडियन्ससाठीच नाही तर अगामी आयसीसी विश्वचषकासाठी भारतीय संघाचाही महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने बेंगलोर विरुद्धच्या या सामन्यात त्याच्या शेवटच्या तीन षटकात फक्त 8 धावा देत मुंबईचे सामन्यातील आव्हान तगडे केले होते.
त्यामुळे त्याचे कौतुक करताना विराटने म्हटले आहे की बुमराह संघात असल्याने मुंबई भाग्यवान आहे.
या सामन्यानंतर विराट म्हणाला, ‘मी चूकीच्या वेळेला बाद झालो. मला म्हणायचे आहे की बुमराह हा अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. माझ्याकडून झालेली छोटी चूक त्याला त्या स्तरावर घेऊन गेली. बुमराह मुंबईच्या संघात असल्याने ते भाग्यवान आहेत आणि मलिंगासुद्धा. जर बुमराह चांगल्या लयीत राहिला तर भारतासाठीही चांगली गोष्ट आहे.’
आयपीएल सुरु होण्याआधी आयपीएलचे प्रमोशन करण्यासाठी खेळाडूंनी एकमेकांना दिलेल्या आव्हांनाचे व्हिडिओ स्टार स्पोर्ट्स सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यामध्ये बुमराहने विराटला बाद करण्याचे चॅलेंज स्विकारले होते. ते त्याने या सामन्यात पूर्ण केले आहे.
याबरोबरच या सामन्याबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘जेव्हा ते(मुंबई) 7 बाद 145 धावांवर होते, तोपर्यंत आम्ही चांगल्या स्थितीत होतो. पण शेवटचे काही षटके आमच्यासाठी फारच वाईट ठरली.’
त्याचबरोबर विराटने एबी डिविलियर्सने केलेल्या अर्धशतकाबद्दल कौतुकही केले. तसेच शेवटच्या काही षटकातील गोलंदाजीची कामगिरी सुधारावी लागेल असेही म्हटले आहे.
मुंबईकडून शेवटच्या काही षटकात हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी करत 14 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 187 धावसंख्या उभारता आली.
मुंबईला प्रतिउत्तर देताना बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने नाबाद 70 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच विराटने 46 धावांची खेळी केली. या दोघांनीमिळून तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारीही केली. पण अन्य फलंदाजांनी खास काही न केल्याने बेंगलोरला 20 षटकात 5 बाद 181 धावाच करता आल्या.
???????????????? – काय होती तुमची प्रतिक्रिया किंग कोहलीच्या प्रतिसादावर ? ????
VIVO @IPL साठी #GameOn सुरुवात झाली आहे. आणि आता आपण वात बघतोय ते @imVkohli आणि @Jaspritbumrah93 च्या आमन्या सामन्याची ! बघा ह्या सगळ्याचं थेट प्रक्षेपण 23 मार्च पासून स्टार स्पोर्ट्स वर. pic.twitter.com/ED65AvmfoP
— Star Sports (@StarSportsIndia) February 28, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–युवराजच्या षटकारांच्या हॅट्रिकनंतर चहलला आठवला स्टुअर्ट ब्रॉड, पहा काय म्हणाला…
–विराटच्या नाराजीनंतरही अंपायरवर कारवाईची शक्यता धूसर, जाणून घ्या कारण
–‘आम्ही आयपीएल खेळतो, क्लब क्रिकेट नाही’, अंपायरवर भडकला विराट कोहली






