भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेपूर्वी झालेल्या टी-२० मालिकेत देखील भारतीय संघाने इंग्लंड संघावर ३-२ ने विजय मिळवला होता. या मालिकेत युवा खेळाडू सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली होती. दोघांनीही संधीचे सोने करत उल्लेखनीय कामगिरी केली होती. सूर्यकुमार यादव गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत होता. अशातच मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक झहीर खान याने सूर्यकुमार यादवबद्दल मोठा खुलासा केला आहे.
सूर्यकुमार यादव गेल्या काही वर्षांपासून आयपीएल आणि देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये आपली छाप सोडत होता. परंतु त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळत नव्हती. त्याने २०२० आयपीएल स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी केली होती. तरी देखील त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी निवड झाली नव्हती. त्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले.
झहीर खानला वाटते की, सूर्यकुमार यादवला अचानक मिळालेल्या यशामागचे मुख्य कारण त्याला जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळत नव्हती, तेव्हा योग्य लोकांना भेटणं आणि त्याचा दृष्टीकोन आहे.
मुंबई इंडियन्स द्वारा आयोजित करण्यात आलेल्या ‘ट्विटर स्पेस विद जैक’मध्ये जहीर खान म्हणाला, “सूर्याबरोबर चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे गेल्या तीन आयपीएलमध्ये तसेच घरगुती सर्किटमध्येही त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राहिले. तो या संधीस पात्र होता आणि त्याने खूप मेहनत घेतली आहे. कधीकधी तुम्हाला संयम ठेवावा लागतो आणि कधीकधी उत्कृष्ट कामगिरी करूनही तुम्हाला संधी मिळत नसते.”
तो म्हणाला, “अनेक गोष्टी सुर्या सोबत घडत होत्या. परंतु त्याने स्वतःला सावरलं. त्याच्यासोबत असणारे लोक त्याची समजूत काढत होते. त्याला संयम ठेवावा लागणार होता. तसेच तो जे करत आहे ते सातत्याने करावे लागणार होते. हे त्याच्या खेळातून दिसून आपणा सर्वांना दिसून आले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्ससाठी खुशखबर! आर्चरच्या हाताची झाली सर्जरी, आयपीएल २०२१ मध्ये खेळण्याची शक्यता
माही भाई काहीही करु शकतो..! हार्दिकच्या ‘त्या’ प्रश्नावर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया
“रिषभ पंतविना भारतीय संघाची कल्पनाच करु शकत नाही,” इंग्लिश दिग्गजाने उधळली स्तुतिसुमने






