मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा नागपूर टप्पा आजपासून सुरू झाला. पहिल्याच दिवशी चुरशीच्या सामन्यांची मेजवानी क्रिकेट चाहत्यांना मिळाली. मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय स्पर्धा प्रथमच मुंबई बाहेर म्हणजेच पुणे आणि नागपूर येथे खेळविण्यात येणार आहे. त्यानुसार आजपासून या स्पर्धेच्या नागपूर टप्प्याला सुरुवात झाली. नागपूर टप्प्यातही १४ वर्षांखालील मुले आणि १६ वर्षांखालील मुले व मुली गटांचे सामने झाले.
नागपूर टप्प्यात ५६ संघांनी सहभाग घेतला असून तीन गटांत एकूण ९५ सामने खेळविण्यात येणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात नागपूर टप्प्यातील अंतिम सामने होतील आणि विजेते संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरतील. त्यांना १६ मार्चला मुंबईत होणाऱ्या अंतिम स्पर्धेची पात्रता मिळवण्याची संधी मिळेल.
१६ वर्षांखालील मुले गटात सेंटर पॉईंट स्कूल ( काटोल रोड) संघाने ३०५ धावांनी पोदार वर्ल्ड स्कूलवर विजय मिळवला. देवांश मिश्राच्या ११६ धावा आणि प्रभविराज लांबाच्या ८९ धावांच्या जोरावर सेंटर पॉईंट स्कूलने ४० षटकांत ८ बाद ३९४ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पोदार वर्ल्ड स्कूलचा संपूर्ण संघ १५.३ षटकांत ८९ धावांत माघारी परतला. देवांशने ८ विकेट्स घेत गोलंदाजीतही बहुमूल्य योगदान दिले.
नागपूर
१६ वर्षांखालील मुले
सेंटर पॉईंट स्कूल ( काटोल रोड) ४० षटकांत ८ बाद ३९४ ( देवांश मिश्रा ११६, प्रभविराज लांबा ८९) वि. वि. पोदार वर्ल्ड स्कूल १५.३ षटकांत सर्वबाद ८९; ३०५ धावांनी विजय; सामनावीर – देवांश मिश्रा ( ११६ धावा आणि ८ विकेट्स)
पोदार इंटरनॅशनल ४० षटकांत ८ बाद २५६ ( पलाश कनोजे ६८, अथर्व बाभुळगावकर ४३) वि. वि. सेंटर पॉईंट स्कूल २०.४ षटकांत सर्वबाद ७२; सामनावीर – पलाश कनोजे (६८ धावा)
एमकेएच संचेटी पब्लिक स्कूल पुढे चाल वि. न्यू ॲपोस्टॉलीक इंग्लिश स्कूल
१४ वर्षांखालील मुले
सेंटर पॉईंट स्कूल ( दाभा) ४.१ षटकांत १ बाद ३९ ( राजवंश अग्रवाल १९*, अमोल शिराळकर १६) वि. वि. प्रेरणापब्लिक स्कूल १८.३ षटकांत सर्वबाद ३७; सामनावीर – कार्तिक अग्रवाल ( ५ विकेट्स)
सेंटर पॉईंट स्कूल ( काटोल रोड) ५.४ षटकांत बिनबाद ५३ ( राजवीर जॉली २३*, देवांश ठक्कर २२*) वि. वि. दिल्ली पब्लिक स्कूल २०. १ षटकांत सर्वबाद ५१; सामनावीर – शमित बुंदेला ( ५ विकेट्स)
गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूल ३५.३ षटकांत ४ बाद १३४ ( जय जैस्वाल ३०*, मनप्रीत रेड्डी २६) वि. वि. सेंटर पॉईंट स्कूल ३२. ५ षटकांत सर्वबाद १३२; सामनावीर – जय चौधरी ( ३ विकेट्स आणि १ निर्धाव षटक)
सेंट फ्रान्सिस डी सॅले स्कूल ३३ षटकांत ९ बाद १४२ ( गुरु पार्तेकी ३२, आदित्य सोनी २०) वि. वि. टीम ॲपोस्टॉलीक इंग्लिश हायस्कूल २१.५ षटकांत सर्वबाद १००; सामनावीर – अभिजीत भराडे ( ६ विकेट्स)
१६ वर्षांखालील मुली
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल ३.४ षटकांत १ बाद ५४ ( रिया बनिया १४, ॲंड्रिया डी ४*) वि. वि. सोमलवार स्कूल ११.५ षटकांत सर्वबाद ५०; सर्वोत्तम खेळाडू – रिया बनिया ( ५ विकेट्स )