---Advertisement---

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश, पण बीसीसीआयला सतावतेय ‘ही’ चिंता

On: मंगळवार, ऑक्टोबर 12, 2021 10:13 PM
---Advertisement---

टी २० विश्वचषक २०२१ साठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे खेळाडू मंगळवारी (१२ ऑक्टोबर) दुबईतील भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये दाखल होतील. विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात मुंबईचे ६ खेळाडू आहेत. यामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.

मात्र, सर्वांच्या नजरा अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे असतील. कारण त्याच्या फिटनेसमुळे भारतीय संघ व्यवस्थापनाचा त्रास वाढला आहे. भारतीय संघ २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळून टी२० विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. अशा स्थितीत संघ व्यवस्थापनाला या सामन्यापूर्वी हार्दिकच्या फिटनेसचे आकलन करायला आवडेल.

एका माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचे खेळाडू मंगळवारी (१२ ऑक्टोबर) पाम हॉटेलमध्ये दाखल होतील. तसेच भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. हार्दिक आपला फिटनेस कसा सुधारतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण तो टी२० विश्वचषकासाठी भारतातील सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. म्हणून त्यांच्यावर विशेष लक्ष असेल.

हार्दिकच्या फिटनेसमुळे भारतीय संघाचा त्रास वाढला
जेव्हा व्यवस्थापनाशी संबंधित सूत्राला, हार्दिक बाबत विचारण्यात आले की, मॅच फिनिशर म्हणून तो संघात सामील होऊ शकतो का? हा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल आणि एमएस धोनी मार्गदर्शक म्हणून संघामध्ये सामील झाल्यानंतर व्यवस्थापन अजून चांगला निर्णय घेऊ शकेल. पण, भारतीय मधल्या फळीला मोठे सामने खेळण्याचा अनुभव नाही. विशेषत: जेव्हा भारत-पाकिस्तानसारख्या संवेदनशील सामना असतो, तेव्हा अशा अनुभवी खेळाडूंची आवश्यकता असते.

हार्दिकचा आत्तापर्यंत पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळ
विशेष म्हणजे हार्दिकने पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध ४३ चेंडूत ७६ धावा केल्या होत्या. याशिवाय २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकातही पाकिस्तानविरुद्ध या अष्टपैलू खेळाडूनेने १९ चेंडूत २६ धावा केल्या होत्या आणि दोन विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

कहर कारनामा! उत्तम प्रदेशच्या वासु वत्सचा मोठा पराक्रम, हॅट्रिकसह घेतल्या तब्बल ८ विकेट्स

आयपीएल स्पर्धेने उघडले नशिबाचे दार; ‘या’ दोन खेळाडूंची होऊ शकते टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात एन्ट्री

आयपीएल २०२१ मधून आरसीबी बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावनिक संदेश; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---