अखेर चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या हाय व्होल्टेज सामन्याने उर्वरित हंगामाचा प्रारंभ होणार असून या सामन्यासाठी दोन्ही संघ मैदानात घाम गाळत आहेत. दरम्यान स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वीच मुंबई इंडियन्स संघाने एका डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाला संधी दिली आहे.
पाच वेळेस आयपीएल स्पर्धचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाही विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी अशा एका धाकड गोलंदाजाला संघात स्थान दिले आहे, जो दर १९ व्या चेंडूवर गडी बाद करतो.
मुंबई इंडियन्स संघाने मोहसीन खानऐवजी रुस कलारियाला संधी दिली आहे. गुजरातच्या २८ वर्षीय रूस कलारियाने आतापर्यंत देशांतर्गत पातळीवर एकूण ३१ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ३७ गडी बाद करण्यात यश आले आहे. यादरम्यान त्याचा ईकोनॉमी रेट ६.५३ चा होता. तसेच कलारीयाने ५४ प्रथम श्रेणी सामन्यात १६८ गडी बाद केले आहेत. तर ४६ लिस्ट ए सामन्यात ६६ गडी बाद केले आहेत.
याखेरीज फलंदाजी करताना त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३ शतक आणि ५ अर्धशतक देखील झळकावले आहेत. तसेच २०१२ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व देखील केले होते.
मुंबई इंडियन्स संघाने मोहसीन खानऐवजी कलारीयाला संधी दिली आहे. मोहसीन देखील डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. २३ वर्षीय मोहसीनला मुंबई इंडियन्स संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याने त्याच्या देशांतर्गत कारकिर्दीत २३ टी-२० सामन्यात ३१ गडी बाद केले होते. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २ आणि १४ लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने २३ गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दमदार सुरुवात, म्हणजे सामनाही खिशात! चेन्नई वि. मुंबई सामन्यात ‘अशी’ असेल उभय संघांची सलामी जोडी