कॅमरून ग्रीन आयपीएल 2023 मध्ये सर्वात महागडल्या खेळाडूंपैकी एक ठरलाय. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा हा फलंदाजी अष्टपैलू आगामी हंगामात मुंबई इंडियन्ससाठी खेळणार आहे. त्याला खरेदी करण्यासाठी मुंबईने तब्बल 17.5 कोटी रुपये खर्च केले. ग्रीन आता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 15 कोटींपेक्षा अधिक रक्कम घेणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. त्याची बेस प्राईज 2 कोटी रुपये असून फ्रँचाझींमध्ये त्याला खरेदी करण्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली. परिणामी त्याची किंमत 17.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.
Cameron Green is SOLD to @mipaltan for INR 17.5 Crore#TATAIPLAuction | @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
कॅमरुन ग्रीन (Cameron Green) ऑस्ट्रेलियन संघाचा महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू असून आयपीएलमध्येही तो चांगली कामगिरी करू शकतो. मुंबई इंडियन्सने त्याला मोठी रक्कम खर्च करून संघात सामीली केले असल्यामुळे त्याला पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. पहिल्याच हंगामात एवढी मोटी रक्कम मिळाल्यामुळे यावरून ग्रीनच्या गुणवत्तेचा अंदाज लावता येऊ शकतो. लिलावात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स ग्रीनला खरेदी करण्यासाठी इच्छुक होते आणि दोन्ही फ्रँचायझींमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली. अखेर मुंबईने सर्वात मोठी बोली लावत या खेळाडूला संघात घेतले.
𝐆𝐫𝐞𝐞𝐧 in 𝔹𝕝𝕦𝕖 & 𝔾𝕠𝕝𝕕 💙💫
Presenting to you, our newest all-rounder ➡️ Cameron Green😎
📸: @ompsyram#DilKholKe #MumbaiIndians #TATAIPLAuction pic.twitter.com/5iW0PmDTer
— Mumbai Indians (@mipaltan) December 23, 2022
ग्रीनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 17 कसोटी, 13 वनडे आणि 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यमध्ये त्याने अनुक्रमे 755, 290 आणि 139 धावा केल्या आहेत. आता त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामात ग्रीन मुंबई इंडियन्ससाठी काय कमाल करकतो याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. (Mumbai Indians spent Rs 17.5 crore to buy Cameron Green)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेचा अष्टपैलू आयपीएलमध्ये घालणार धुमाकूळ, मिनी लिलावात पंजाबने केली ‘एवढ्या’ लाखांची उधळण
न भूतो! 18 कोटी 50 लाखांची बोली मिळवून सॅम करनने घडवला इतिहास; या संघाचा झाला भाग