इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मधील दुसऱ्या टप्प्यातील सामने येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यासाठी सर्व आयपीएल संघाची तयारी चालू झाली आहे. दरम्यान आयपीएलचा संघ मुंबई इंडियन्स शुक्रवारी (१३ ऑगस्ट) अबुधाबीसाठी रवाना झाला आहे. याबाबतचा फोटो शेअर करत त्यांनी माहिती दिली. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघ देखील दुबईला पोहचला आहे.
मुंबई इंडियन्सचा ‘टॅलेंट स्काउट’ आर विनय कुमारचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून त्यावर ‘अबुधाबी बाऊंड’ असे लिहिलेले आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघातील अष्टपैलू खेळाडू जयंत यादवचा प्रवासादरम्यानचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यात लिहिले आहे ‘ऑफ वी गो’
🄰🄱🅄 🄳🄷🄰🄱🄸 🄱🄾🅄🄽🄳 ✈️#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @Vinay_Kumar_R pic.twitter.com/oRetLrxZrt
— Mumbai Indians (@mipaltan) August 13, 2021
मुंबई इंडियन्स संघातील यूएईला रवाना होणारे सदस्य हे भारतीय खेळाडूच आहेत. अबुधाबीला पोहोचल्यावर खेळाडूंना विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतर सराव शिबिराला सुरुवात करणार आहे. मागील दोन आठवड्यांपासून मुंबई इंडियन्स संघासाठी घनसोली येथील रिलायंस कॉर्पोरेट पार्कमधील जिओ स्टेडियमवर सरावासाठी शिबिराचे आयोजन केले होते.
Destination ➡️ Abu Dhabi 🇦🇪
Status ➡️ Arrived ✅#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @MarriottBonvoy @StRegisSaadiyat pic.twitter.com/JtlIZEPtVc— Mumbai Indians (@mipaltan) August 13, 2021
तसेच चेन्नई सुपर किंग्सनेही त्यांचे खेळाडू दुबईत पोहचल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यांनी एका व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘वन्नकम अगेन दुबई’.
Vanakkam again Dubai 😎#UrsAnbudenEverywhere #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/2wAjzwfxh3
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 13, 2021
आयपीएलच्या १४ व्या हंगामात कोरोनाचा शिरकाव झाल्याने २९ सामन्यांनंतर स्थगिती देण्यात आली होती. नंतर बीसीसीआयने १९ सप्टेंबर पासून दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ३१ सामने यूएई येथील दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन शहरात होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रत्येक आयपीएल संघाने यासाठी जोरदार तयारी चालू केली.
दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये होणार आहे. आयपीएल स्थगित होण्यापूर्वी आयपीएलचे एकूण २९ सामने झाले होते. ज्यात ८ पैकी ६ सामने जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर ७ पैकी ५ सामने जिंकून चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच ७ पैकी ४ सामने जिंकत मुंबईचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
–वॉन-जाफर यांच्यातील ‘कोल्डवॉर’ अद्यापही सुरुच; भारतीय क्रिकेटरकडून पुन्हा माजी कर्णधार ट्रोल
–ऑस्ट्रेलियाला बसणार मोठा धक्का? चक्क नियमित कर्णधारच टी२० विश्वचषकात न खेळण्याची शक्यता
–“महान खेळाडूची हीच ओळख असते, जेव्हा तो फॉर्ममध्ये नसतो तेव्हा तो…”, माजी क्रिकेटरचा विराटला पाठिंबा