क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग होतानाच्या घटना आपण बऱ्याचदा ऐकल्या आहेत. त्यातही जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये हे प्रकरण जरा जास्तच घडताना दिसून येते. तसं तर मॅच फिक्सिंग हा खूप संवेदनशील मुद्दा आहे, परंतु चाहत्यांनी चक्क रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघाला मॅच फिक्सिंगच्या नावाखाली ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
झाले असे की, संयुक्त अरब अमिरातीत (युएई) चालू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातील २७वा सामना रविवारी (११ ऑक्टोबर) मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात मुंबईने दमदार प्रदर्शन करत दिल्लीला ५ विकेट्सने पराभूत केले आणि गुणतालिकेत अव्वल क्रमांक गाठला.
मात्र नाणेफेक होऊन सामन्याची सुरुवात झाल्यानंतर जवळपास ८ मिनिटांनी मुंबई संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केले. त्या ट्विटमध्ये त्यांनी दिल्ली संघ मुंबईला किती धावांचे आव्हान देईल, याचा अंदाज वर्तवला होता. “पॅटिसन आणि बोल्ट दोघे पावरप्लेमध्ये गोलंदाजी करतील. खाली दिल्ली संघ १९.५ षटकात ५ विकेट्स गमावत १६३ धावा करेल,” असे त्यांनी लिहिले होते.
पण आश्चर्याची बाब ही ठरली की, दिल्लीनेही रविवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १६२ धावा केल्या. म्हणजे मुंबईने ट्विटमध्ये दिलेल्या धावसंख्येच्या जवळपास त्यांनी धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत सामना खिशात घातला.
https://twitter.com/VickyVjMsd/status/1315316455290798080?s=20
त्यानंतर मात्र चाहत्यांनी मुंबईला त्यांच्या ट्विटवरुन दिल्लीविरुद्धची मॅच फिक्स केल्याचे आरोप करायला सुरुवात केली. पाहता-पाहता चाहत्यांनी मुंबईला ट्विटरवर ट्रोल करायला सुरुवात केली. हे पाहता मुंबईने ते ट्विट डिलिट केले. पण तेव्हापर्यंत काही चाहत्यांनी त्या ट्विटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे मुंबई संघ चांगलाच गोत्यात सापडला.
महत्त्वाच्या बातम्या-
हॅलोsss आपल्याला IPLची मॅच फिक्स करायचीये… खेळाडूने थेट अँटीकरप्शनलाच दिली माहिती
क्रिकेट जगतात खळबळ! दोन क्रिकेटरचे मॅच फिक्सिंग प्रकरणी निलंबन
वाढदिवशी शुबमनकडून साराला नाही मिळालं हवं ते गिफ्ट, मग काय झालं नक्कीच पाहा
ट्रेंडिंग लेख-
मॅच-फिक्सिंगच्या आरोपामुळे बंदी घालण्यात आलेले ५ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू
युवा फलंदाजांचाच बोलबाला! यंदा रोहित, पोलार्ड नाही तर ‘या’ खेळाडूने ठोकले सर्वाधिक षटकार
आयपीएल २०२० मध्ये सुपर डूपर फ्लॉप ठरलेले खेळाडू; रसेल, मॅक्सवेलसह ‘या’ खेळाडूंचाही समावेश