आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या वनडे व टी20 मालिकांमध्ये अनुक्रमे रोहित शर्मा (Rohit Sharma) व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) भारतीय संघाचे नेतृत्व करतील. सूर्यकुमार याच्याकडे टी20 संघाचे नेतृत्व देऊन आगामी विश्वचषकापर्यंतचा विचार बीसीसीआयने केल्याचे समजते. मात्र, असे असतानाच सूर्यकुमारचे अभिनंदन करताना मुंबई इंडियन्स संघाने (Mumbai Indians) केलेले ट्विट ही वायरल होत आहे.
गुरुवारी (18 जुलै) श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. रोहित शर्मा याने वनडे संघात पुनरागमन केले. त्यामुळे तो थेट कर्णधार बनला. दुसरीकडे टी20 संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्या याच्या नावाची चर्चा होती. परंतु ऐनवेळी निवडसमितीने सूर्यकुमार यादव याच्या गळ्यात ही माळ घातली. विश्वचषकात हार्दिक संघाचा उपकर्णधार असल्याने तो पुढील टी20 कर्णधार असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसे होऊ शकले नाही.
या दोन्ही संघांचे कर्णधार हे मुंबई इंडियन्ससाठी खेळत असल्याने मुंबई इंडियन्सकडून खास पोस्ट करण्यात आली. यामध्ये भारतीय संघ व कर्णधारांचे अभिनंदन केले गेले. परंतु, या पोस्टसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मुंबई इंडियन्सच्या या पोस्टला ‘आता पुढच्या गोष्टीवर फोकस करूया’ असे कॅप्शन दिले गेले. याचा चाहत्यांनी वेगवेगळा अर्थ काढला. काहींनी पोस्ट करत असे म्हटले, ‘पुढची गोष्ट म्हणजे सूर्यकुमार हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार आहे.’ तर काहींनी ही पोस्ट खास हार्दिकसाठी असल्याचे देखील म्हटले.
Time to focus on the next 🏆
Next assignment: 🇱🇰#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #SLvIND pic.twitter.com/mDxG6gDshR— Mumbai Indians (@mipaltan) July 18, 2024
सध्या मुंबई इंडियन्स संघात वेगळीच मजा सुरू झालेली आहे. रोहित शर्मा हा भारताच्या कसोटी व वनडे संघाचा कर्णधार असून, आता सूर्यकुमार टी20 संघाचे नेतृत्व करेल. विशेष म्हणजे भारतीय संघात आता केवळ खेळाडू म्हणून असलेला हार्दिक पंड्या हे दोघे खेळत असलेल्या, मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करतो. त्यामुळे आयपीएल 2025 वेळी मुंबई इंडियन्स यातील किती जणांना रिटेन करते हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
या 3 कारणांमुळे झाली रियान परागची भारतीय संघात निवड, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत ठरला होता फ्लॉप
संपुर्ण यादीः घटस्फोट घेतलेले 9 दिग्गज भारतीय क्रिकेटर्स, एकाने तर…
टीम इंडियाची घोषणा: गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन? धोनीच्या विश्वासू खेळाडूला संघातून वगळलं!