इंडियन प्रीमीयर लीगचा(आयपीएल) १३ व्या मोसमाला सध्या कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव लक्षात घेता १५ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. आयपीएलचा हा १३ वा मोसम २९ मार्चपासून सुरु होणार होता. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात वानखेडे स्टेडियमवर होणार होता. पण आयपीएल स्थगित केले असल्याने हा सामना झाला नाही.
मात्र मुंबई इंडियन्सने ७.३० वाजता नाणेफेकीबद्दल ट्विट करत सर्वांना हा सामना काल(२९ मार्च) होणार होता, अशी आठवण करुन दिली. त्यांनी ट्विट केले की ‘वानखेडेवर नाणेफेक होण्याची वेळ झाली आहे.’ यापुढे त्यांनी रडण्याचे इमोजीही वापरले आहेत.
🕢 It's toss time at the Wankhede 😭😩#OneFamily #MIvCSK
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2020
तसेच त्यांच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी म्हटले आहे की कोरानाने टॉस जिंकला आहे.
Corona won the toss and decided to ruin the life's of people 😕😕😕
— Arunabh (@arunabh_28) March 29, 2020
https://twitter.com/BeingAjay18/status/1244263845662785537
corona
— Sumanth Yarlagadda (@su_yarlagadda) March 29, 2020
त्यानंतर मुंबई इंडियन्सने पुन्हा काही वेळात आणखी एक ट्विट केले, ‘पलटन काळजी करु नका. आपण आज ८ वाजता अजूनही एक गेम खेळू शकतो.’
Don't worry, Paltan! We've still got a game at 8 PM tonight!
Watch this space for more…⏳#OneFamily #MIvCSK
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2020
यानंतर मुंबई इंडियन्सने मागील आयपीएल मोसमांचा संदर्भ घेत काही प्रश्न चाहत्यांना विचारायला सुरुवात केली. तसेच शेवटी त्यांनी ट्विट केले की ‘आम्ही वानखेडे स्टेडियमवरील फ्लडलाईट्स लागण्याची वाट पाहत आहोत. पण सध्या सुरक्षितता महत्त्वाची आहे.’
We'll wait for the floodlights to turn on at the Wankhede Stadium!
Safety first, Paltan. #OneFamily 💙 pic.twitter.com/wocvhZeNvl
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2020
याबरोबरच चेन्नई सुपर किंग्सनेही काल ट्विट केले होते की ‘हा रविवार किती रोमांचकारी झाला असता!’
What a Sunday this would have been! Sigh! #WhistlePoduFromHome 🦁💛 pic.twitter.com/w3kApja7xw
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 29, 2020
मात्र सध्या भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलच्या १३ व्या मोसमाच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
वय वर्ष १६ असलेल्या क्रिकेटरने कोरोनाविरुद्धच्या लढाईत केली एवढ्या लाखाची मदत
एक नाही दोन नाही तर सगळ्या संघालाच जेव्हा दिली होती मॅन ऑफ द मॅच
२००८ विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील खेळाडू सध्या आहेत तरी कुठे?