आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अशातच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. नवीन जर्सीच्या अनावरणाचा एक खास व्हिडिओ मुंबई इंडियन्सने ट्विटरवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये जयदीप गोहिल (हॅड्रोमॅन) हा पाण्यात मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी घालून डान्स करत आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘ब्ल्यू. गोल्ड. आला रे!! अखेर प्रतिक्षा संपली आहे. पलटन ही तूमची नवीन जर्सी आहे.’
मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी नेहमीप्रमाणे निळ्या आणि सोनेरी रंग छटांमध्ये आहे. ही जर्सी हाताला आणि कॉलरला गडद निळ्या रंगाची आहे. तर पुढच्या आणि पाठीच्या बाजूला थोडी फिक्या निळ्या रंगाची आहे. त्याचबरोबर खांद्यावर सोनेरी रंग आहे.
👕 BLUE. ✨GOLD. 👊🏻AALA RE!!!
😍 The wait is over. Paltan, here’s our official jersey for #Dream11IPL! 💙
Pre-order on: https://t.co/14Jd096jBN#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @hydroman_333 @thesouledstore pic.twitter.com/4eKZYWjQPV
— Mumbai Indians (@mipaltan) August 30, 2020
सध्या मुंबई इंडियन्सच्या संघातील सदस्यांचा युएईला पोहचल्यानंतरचा ६ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला आहे. आता त्यांनी सुरक्षिततेची खबरदारी घेत सरावाला सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तान क्रिकेटरच्या चुकीमुळे संघ संकटात, मोडला आयसीसीचा मोठा नियम
सीएसकेचे मॅनेजमेंट बीसीसीआयच्या रडारवर, चेन्नईच्या संघाला थेट…
क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर आरसीबी संघाने सर्वात आधी केले हे काम
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता
या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
आयपीएलच्या सर्व संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…