इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला. हा सामना जिंकून मुंबईने आयपीएल कारकिर्दीतील 5 वा किताब जिंकला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे.
रोहितने संघाला केले प्रेरित
या विजयानंतर बुधवारी (11 नोव्हेंबर) मुंबई इंडिअन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये रोहित संघातील खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी म्हणाला की, “प्रत्येकाने चेहऱ्यावर हास्य ठेवा. आपण सामना जिंकू किंवा हरू, आपल्याला हसायचं आहे.”
या व्हिडिओमध्ये मुंबईच्या संघातील सर्व खेळाडूची झलक दाखवली आहे. त्यानंतर मुंबईला सहकार्य करणारे चाहतेही पाहायला मिळाले. मात्र हा ट्विट काहीवेळातच मुंबई इंडियन्सने डिलिट केला
दिल्ली कॅपिटल्सने केल्या 156 धावा
या महत्वपूर्ण अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्ताखालील दिल्लीने नानेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर मार्कस स्टॉइनिस तंबूत परतला. अनुभवी फलंदाज अजिंक्य राहणे (2 धावा) आणि शिखर धवन (15 धावा) यांनाही काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर श्रेयस अय्यर (65 धावा) आणि रिषभ पंत (56 धावा) यांनी 96 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.त्यांच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीला 20 षटकांत 156 धावा करता आल्या.
मुंबईने मिळवला विजय
प्रत्युत्तरादाखल मुंबईची सुरुवात चांगली झाली.सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक यांनी डावाच्या सुरुवातीच्या काही षटकांत 10 च्या रनरेटने धावा केल्या. मात्र, 5 व्या षटकात क्विंटन डिकॉक बाद झाला. त्याला अवघ्या 20 धावाच करता आल्या. डिकॉक बाद झाल्यानंतर रोहितने आपली आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने 51 चेंडूत 68 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा निभावला. रोहित बाद झाल्यानंतर युवा फलंदाज ईशान किशनने 19 चेंडूत 33 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे मुंबईने 18.4 षटकांत हे लक्ष्य सहजपणे गाठलं.
रोहितने मुंबईकडून खेळताना पूर्ण केल्या 4000 धावा
या सामन्यात अवघ्या 8 धावा करत रोहितने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 4000 धावा पूर्ण केल्या. तो मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शेतीनंतर आता धोनी कुक्कुटपालन व्यवसायात; ‘या’ खास कोंबड्यांचा करणार व्यापार
पिछा ना छोडेंगे! चेन्नईनंतर ‘हा’ मोठा किर्तीमान मिळवणारा मुंबई दुसराच संघ