---Advertisement---

असा आहे मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या अंतिम सामन्यातील इतिहास

On: बुधवार, मे 8, 2019 3:30 PM
---Advertisement---

चेन्नई। मंगळवारी(7 मे) आयपीएल 2019 मध्ये क्वालिफायर 1 चा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर अंतिम सामन्यातही थेट प्रवेश केला.

मुंबई इंडियन्सचा हा आयपीएलमधील पाचवा अंतिम सामना असणार आहे. त्याआधी खेळलेल्या 4 आयपीएलच्या अंतिम सामन्यांपैकी 3 वेळा मुंबई इंडियन्सने विजय मिळवत विजेतेपद मिळवले आहे. विशेष म्हणजे मुंबईने ही तीनही विजेतीपदे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मिळवली आहेत.

रोहितने 2013 पासून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली यावर्षी चौथ्यांदा मुंबईने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 2013 च्या आधी मुंबईने 2010 मध्ये अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. पण त्यावेळी सचिन तेंडूलकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला चेन्नई विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यांनतर 2013, 2015 आणि 2017 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि या तीनही मोसमाची विजेतेपदेही मिळवली आहेत.

विशेष म्हणजे 2013 आणि 2015 मध्येही चेन्नई आणि मुंबई संघात आयपीएलचा अंतिम सामना झाला होता. या दोन्हीवेळेस मुंबईने विजय मिळवत आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर 2017 मध्ये मुंबईने रायझिंग पुणे सुपर जायंट्स विरुद्ध 1 धावेने अंतिम सामन्यात विजय मिळवत तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आणि असे करणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला होता.

आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स अपराजित राहण्याचा विक्रम कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. आयपीएल 2019 चा अंतिम सामना 12 मे ला हैद्राबाद येथे होणार आहे.

मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश – 

2010 – उपविजेतेपद ( विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स)

2013 – विजेतेपद (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स)

2015 – विजेतेपद (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स)

2017 – विजेतेपद (विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट्स)

2019 – ??

महत्त्वाच्या बातम्या –

एमएस धोनीने सांगितले मुंबई विरुद्ध झालेल्या पराभवाचे कारण…

विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, हा वेगवान गोलंदाज संघातून बाहेर…

आयपीएल आता आयआयटीच्या परिक्षेत! धोनीने काय निर्णय घ्यावा, असा विद्यार्थ्यांना प्रश्न…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment