भुवनेश्वर, ३० डिसेंबर: अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये आज चेन्नई क्विक गन्स व मुंबई खिलाडीस यांच्यात झालेला सामना पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने मुंबई खिलाडीसचा ५ गुणांनी पराभव केला हा सामना कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाला. आज झालेल्या अकराव्या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने मुंबई खिलाडीस वर ३६ – ३१ (मध्यंतर १९-१६) असा ५ गुणांनी विजय मिळवला. चेन्नई क्विक गन्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व मुंबई खिलाडीसला आक्रमणासाठी आमंत्रित केले. अमित बर्मन यांनी सुरु केलेली ल्टीमेट खो खो स्पर्धा खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने सुरु केली आहे.
पहिल्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसने आक्रमणास सुरवात केल्यावर चेन्नईने आदर्श मोहिते, लक्ष्मण गवस व सुमन बर्मन यांनी संरक्षणाला सुरवात केली. मुंबईने जोरदार आक्रमण करत ३.२० मि. पहिली तुकडी बाद केली व त्यावेळी बर्मनने सर्वाधिक वेळ संरक्षण केले व त्याचवेळी लक्ष्मण गवसने आपल्या संघाला ड्रीम रन्सचा १ गुण मिळवून दिला. दुसऱ्या तुकडीत रामजी कश्यपने उत्कृष्ट संरक्षण केले व सहाव्या मि. नंतर दुसरी तुकडी सुध्दा बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील दोन खेळाडू बाद झाल्याने मुंबई खिलाडीसने १६ गुणांची कमाई केली.
दुसऱ्या टर्न मध्ये चेन्नई क्विक गन्सने आक्रमणास सुरवात केल्यावर मुंबई खिलाडीसची पहिली तुकडी आल्यावर अर्ध्या मिनिटात पहिला खेळाडू बाद झाला तर १.३८ मि. संपूर्ण तुकडी बाद केली. मुंबई ची पहिली तुकडी पूर्णपणे अपयशी ठरली. दुसऱ्या तुकडीतील ३.४१ मि. बाद झाली तर तिसरी तुकडी जवळ जवळ साडेसहा मि. बाद झाली. या टर्नच्या अखेरीस सामना चेन्नई क्विक गन्सने १९-१६ अशी ३ गुणांनी मुंबई खिलाडीवर आघाडी घेतली.
मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये सचिन भर्गो, सुरज झोरे व आकाश कदम हि चेन्नई क्विक गन्सची पहिली तुकडी संरक्षणास आली होती व मुंबईने २.५५ मि. पहिली तुकडी बाद झाली. दुसऱ्या तुकडीतल्या रामजी कश्यपने २.२६ मि. संरक्षण करत ड्रीम रन्सचा १ गुण मिळवून दिला व साडेसहा मि. तुकडी बाद झाली.
चौथ्या व शेवटच्या टर्न मध्ये पहिला संरक्षक २ मि. नंतर बाद झाला. तर पुढचा संरक्षक अर्ध्या मिनिटाच्या आत बाद झाला. तर रामजी कश्यपने तुकडीतील शेवटचा संरक्षक सव्वा तीन मि. बाद केला. दुसरी तुकडी सहाव्या मि. तुकडी बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील दोन खेळाडू बाद झाल्याने चेन्नई क्विक गन्सला सहज विजय साजरा करता आला. या सामन्यात मुंबईच्या हृषिकेश मुर्चावडेला सर्वोत्कृष्ट आक्रमक, सुरज लांडेला सर्वोत्कृष्ट संरक्षक तर रामजी कश्यपला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रवीवारी पहिला सामना तेलुगू योद्धास व ओडिशा जगरनॉट्स यांच्यात तर दुसरा सामना राजस्थान वॉरियर्स व मुंबई खिलाडीस यांच्यात रंगेल. हे सर्व अल्टीमेट खो-खो चे सामने दररोज सायंकाळी ७.३० पासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव अॅपवर थेट पहाता येतील.
महत्वाच्या बातम्या –
‘या’ 5 गोलंदाजांनी 2023 मध्ये केल्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शिकार, फक्त एका भारतीयाने मिळवले स्थान
भारत-पाकिस्तान ही रायवलरी नाहीच! दिग्गजाकडून समजले टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या आव्हानाचे नाव