---Advertisement---

‘मला सेहवागसारखे स्वातंत्र्य मिळाले नाही, आज मी…’, संधीसाठी झगडणाऱ्या खेळाडूचा बीसीसीआयवर निशाणा

On: मंगळवार, जानेवारी 17, 2023 3:31 PM
Murali-Vijay-And-Virender-Sehwag
---Advertisement---

भारतीय संघाचा फलंदाज मुरली विजय मागील काही वर्षांपासून संघातून बाहेर आहे. त्याने आता बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत म्हटले होते की, 30 वय झाले की, भारतात खेळाडूंना म्हातारे मानले जाते. खरं तर, तो म्हणाला आहे की, त्याची कारकीर्द अजूनही शिल्लक आहे, पण बीसीसीआय त्याला संधी देत नाहीये. त्याच्यात अजूनही चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे, पण संघात निवडला न गेल्यामुळे त्याला आता परदेशात जाऊन व्यावसायिक क्रिकेट खेळायचे आहे. यादरम्यान त्याने वीरेंद्र सेहवाग याच्या नावाचाही उल्लेख केला. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले आहे.

सेहवागविषयी काय म्हणाला विजय?
माध्यमांशी बोलताना मुरली विजय (Murali Vijay) म्हणाला की, “प्रामाणिकपणे बोलायचं झालं, तर वीरेंद्र सेहवाग याच्यासारखे स्वातंत्र्य मला मिळाले नाही. सेहवागला त्याच्या आयुष्यात जे काही मिळाले, ते मला मिळाले नाही. जर मला त्याच्याप्रमाणे संघ व्यवस्थापनाचे समर्थन मिळाले असते, तर मीदेखील माझ्या कारकीर्दीत आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू शकलो असतो. संघाचा पाठिंबा तुमच्यासोबत असेल, तर तुम्ही कुठेही चांगली कामगिरी करू शकता, ही प्रामाणिक गोष्ट आहे.”

वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याच्यासोबत खेळण्याचा अनुभवही विजयने शेअर केला. तो म्हणाला की, “सेहवागसोबत फलंदाजी केल्यामुळे त्याला स्वत:ला क्रीझवर रोखून धरण्याच अडचण यायची. त्याची फलंदाजी पाहून मलाही शॉट मारण्याचा मोह व्हायचा.”

विजय असेही म्हणाला की, “सेहवागला स्वातंत्र्यासह फलंदाजी करताना पाहणे शानदार अनुभव होता. मला वाटतेकी, त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली, तशी इतर कुणीही करू शकत नव्हते. त्याच्यासोबत फलंदाजी करणे माझ्यासाठी खूपच यादगार राहिले आहे.”

खरं तर, मुरली विजय याने त्याचा शेवटचा कसोटी सामना 2018मध्ये खेळला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. नुकताच तो तमिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये खेळताना दिसला होता. तसेच, आयपीएलमध्ये विजय शेवटचा 2019मध्ये खेळताना दिसला होता. जवळपास 3 पेक्षा जास्त वर्षे विजयने देशांतर्गत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीये. आता तो त्याच्या कारकीर्दीविषयी काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (murali vijay on virendra sehwag says i didnt get sehwags like freedom in the team read more)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टीम इंडियाला मोठा झटका, प्रमुख खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूचा समावेश
‘या’ पक्षाने केली सूर्यकुमार यादवची नक्कल! संघसहकारी अर्शदीपही म्हणाला, ‘पाजी तुमची कॉपी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---