---Advertisement---

अटकेपासून वाचण्यासाठी सुशीलची पळापळ, १८ दिवसांत १९ ठिकाणं बदलली; शेवटी व्हायचे तेच झाले!

On: सोमवार, मे 24, 2021 8:41 AM
---Advertisement---

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ५ मे रोजी कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. या चकमकीत जखमी झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर पदक विजेता कुस्तीपटू सागर धनखड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येप्रकरणात भारताचा दोन वेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार याचे नाव पुढे आले होते. परंतु अटकेपासून वाचण्यासाठी तो मागील १८ दिवस प्रयत्नात होता. अखेर शनिवारी (२३ मे) दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

तब्बल १९ दिवस फरार असलेला सुशील पोलिसांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी सतत ठिकाणे बदलत होता. दिल्लीतून फरार झाल्यानंतर तो उत्तर प्रदेशवरुन उत्तराखंडला गेला. तेथून त्याने हरियाणा, चंदीगढ, पंजाब, पुन्हा हरियाणा आणि शेवटी पुन्हा दिल्लीत परतला. यादरम्यान आरोपी सुशीलने लपण्यासाठी १९ ठिकाणी वेगवेगळ्या ओळखीच्या लोकांची मदत घेतली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील हरिद्वार, ऋषिकेशमधील आश्रमांसहित ३ ठिकाणी थोड्या-थोड्या कालावधीसाठी थांबला होता. दिल्ली शहरातच त्याने ४ वेळा जागा बदलली होती. त्यानंतर हरियाणातील बहादुरगडमध्ये तो ३ वेगवेगळ्या ठिकाणी राहिला होता. झज्जरमध्येही २ ठिकाणी त्याने आपले तोंड लपवले होते. पुढे चंदीगडमध्ये त्याने आसरा घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी तो पंजाबमधील बठिंडाला गेला. बठिंडाहून तो माघारी गुरुग्रामला आला. पश्चिम दिल्लीमध्ये तो काही काळ राहिला. इथे त्याने एका व्यक्तीची भेट घेतली.

इथूनही तो पुन्हा निसटण्याच्या प्रयत्न होता. तो आपली कार सोडून स्कूटीच्या मदतीने मुंडका येथे पोहोचला. अखेर इथेच त्याचा पळापळीचा खेळ संपला आणि दिल्ली पोलिसांनी मुंडका येथे मित्र अजयसह त्याला अटक केली.

अशाप्रकारे दिल्लीतून फरार झाल्यानंतर आरोपी सुशीलने १८ दिवसांत १९ ठिकाणे बददली. दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिस या ठिकाणांविषयी आणि दरम्यानच्या काळात त्याला मदत करणाऱ्या व्यक्तींविषयी त्याला विचारपूस करत आहेत.

भारताचा सर्वात यशस्वी कुस्तीपटू आहे सुशील
सुशील कुमारने २००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक मिळवून देशाला ५६ वर्षांनंतर कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. २०१२ लंडन ऑलम्पिकमध्ये त्याने रौप्य पदक आपल्या नावे केलेले. सुशीलने सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याला भारत सरकारकडून सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व अर्जुन पुरस्कार दिला गेला आहे. तसेच, भारतातील चौथा सर्वात मोठा नागरी सन्मान पद्मश्री देखील त्याच्या नावे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जागतिक कुस्ती दिनीच भारताच्या अव्वल कुस्तीपटूला अटक, सहा राज्यांमध्ये होता फरार

मोठी बातमी! दोन वेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला सागर धनखड हत्येप्रकरणी अखेर अटक

ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार अडचणीत, जामीन अर्ज फेटाळल्याने कुठल्याही क्षणी होणार अटक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---