---Advertisement---

श्रीलंकेविरुद्ध शतक झळकवत मुशफिकुर रहीमचा खास पराक्रम, दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

On: मंगळवार, मे 25, 2021 9:28 PM
---Advertisement---

श्रीलंकन संघ सध्या बांग्लादेश दौर्‍यावर असून उभय संघामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातील दुसरा सामना आज ढाक्याच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना बांग्लादेशने ५० षटकांत सर्वबाद २४६ धावा केल्या. यात मुशफिकुर रहीमच्या शतकाचा सगळ्यात मोठा वाटा होता. या शतकासह मुशफिकुर रहीमने एक खास कारनामा केला आहे, ज्यामुळे दिग्गजांच्या पंक्तीत त्याने स्थान मिळवले आहे.

मुशफिकुर रहीमची एकाकी झुंज
बांग्लादेश विरूद्ध श्रीलंकेचा पहिला वनडे सामना २३ मे रोजी खेळवला गेला होता. ज्यात बांग्लादेशने ३३ धावांनी विजय मिळविला होता. आजच्या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात देखील बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी उभारता येत नव्हती. त्यावेळी मुशफिकुर रहीम संघासाठी धावून आला. त्याने १२७ चेंडूत १२५ धावांची झुंजार शतकी खेळी साकारली. ज्यामुळे बांग्लादेशला २४६ धावांची मजल मारता आली.

मुशफिकुरच्या नावे झाला खास विक्रम
मुशफिकुर रहीमचे वनडे सामन्यातील चौथ्या क्रमांकावरील हे आठवे शतक होते. हा विक्रम करणारा तो बांग्लादेशचा एकमेव खेळाडू ठरला. श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने याने चौथ्या क्रमांकावर येत ९ शतके झळकावली आहेत. त्यासाठी त्याने २१९ डाव खेळले आहेत. तर मुशफिकुर रहीमने ८ शतके झळकावण्यासाठी १०४ डाव खेळले आहेत. आजच्या खेळीत मुशफिकुरने चौथ्या क्रमांकावर सहा हजार धावांचा टप्पा पण ओलांडला. हा कारनामा करणारा तो केवळ सहावा खेळाडू ठरला.

सामन्यात आला पावसाचा व्यत्यय
दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना थांबवावा लागला आहे. खेळ थांबला तेव्हा बांगलादेशच्या २४७ धावांचा पाठलाग करतांना श्रीलंकेची ३८ षटकात ९ बाद १२६ धावा अशी अवस्था झाली होती. त्यांना विजयासाठी अजून ७२ चेंडूत १२१ धावांची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबई क्रिकेट संघाला नव्या महागुरूचा शोध; रणजी क्रिकेट गाजवणारे शिलेदार शर्यतीत

कसोटी क्रिकेटमध्ये १ ते ११ क्रमांकावर सर्वाधिक शतके ठोकणारे भारतीय फलंदाज, पाहा संपूर्ण यादी

‘या’ गोष्टीमुळे जसप्रीत बुमराहची कारकीर्द आहे धोक्यात, रिचर्ड हॅडली यांचा इशारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---