भारतात देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेत शुक्रवारी (29 नोव्हेंबर) कर्नाटक आणि तामिळमाडू संघांनी अंतिम सामन्यात आपली जागा निश्चित केली आहे.
या स्पर्धेत शुक्रवारी उपांत्य फेरीचे सामने पार पडले. या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात कर्नाटकने हरियाणाला आठ विकेट्सने सहज पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात कर्नाटककडून अभिमन्यू मिथुनने हॅट्रिकसह एकाच षटकात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
तसेच फलंदाजीमध्ये कर्नाटककडून केएल राहुलनने 66 धावांची तर देवदत्त पड्डीकलने 87 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे कर्नाटकेने या सामन्यात हरियाणाने दिलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कर्नाटकने 15 षटकातच पूर्ण केला.
तत्पूर्वी हरियाणाने चैतन्य बिश्नोई (55) आणि हिमांशू राणा (61) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 194 धावा केल्या होत्या.
तसेच त्यानंतर शुक्रवारी तमिळनाडू विरुद्ध राजस्थान संघात पार पडलेल्या दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात तमिळनाडूने 7 विकेट्सने विजय मिळवला आणि अंतिम सामन्यातील आपले स्थान पक्के केले.
या सामन्यात राजस्थानला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 112 धावाच करता आल्या होत्या. राजस्थानकडून केवळ चार फलंदाजांनाच दुहेरी धावसंख्या पार करता आली. यामध्ये राजेश बिश्नोई(23), चंद्रपाल सिंग(15), रवी बिश्नोई(22*) आणि अंकित लांबा(15) यांचा समावेश आहे. तमिळनाडूकडून गोलंदाजी करताना विजय शंकरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 113 धावांचे लक्ष्य तमिळनाडूने 17.5 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. त्यांच्याकडून वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर आर अश्विनने 31 धावा केल्या. राजस्थानकडून दीपक चाहर, चंद्रपाल सिंग आणि अनिकेत चौधरी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
आता उपांत्य फेरीत विजय मिळवलेले कर्नाटक आणि तमिळनाडू संघ एकमेकांविरुद्ध रविवारी, 1 डिसेंबरला अंतिम सामना खेळतील. हा अंतिम सामना लालाभाई काँट्राक्टर स्टेडियम, सुरत येथे होईल.
या स्पर्धेआधी पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही कर्नाटक आणि तामिळनाडू संघात अंतिम सामना पार पडला होता. यामध्ये कर्नाटक संघांने विजेतेपद पटकावले होते.
हॅट्रिकसह एकाच ओव्हरमध्ये ५ विकेट्स घेत अभिमन्यू मिथूनने रचला इतिहास
वाचा👉https://t.co/4YtqABX4e8👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #abhimanyumithun— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019
वॉर्नर, स्मिथ आणि ब्रॅडमन… जुळून आलाय हा विलक्षण योगायोग!!
वाचा👉https://t.co/19DqxMKUfP👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #AUSvsPAK #SteveSmith #DavidWarner #DonBradman— Maha Sports (@Maha_Sports) November 30, 2019