मुंबई। सोमवारी (२ मे) वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ४७ वा सामना झाला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात कोलताचा नाईट रायडर्सने ७ विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरी या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायर याच्या फटकेबाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानला १५० धावांचा टप्पा ओलांडता आला होता. दरम्यान, त्याने त्याच्या फलंदाजीबद्दल बोलताना त्याच्या पत्नीच्या योगदानाबद्दल मोठे भाष्य केले आहे.
हेटमायरने (Shimron Heymyer) आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) ६५ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. त्यामुळे त्याच्या चांगल्या फॉर्मचा राजस्थानला फायदा होत आहे. पण त्याने त्याच्या फलंदाजीत सुधारणा होण्याचे श्रेय त्याची पत्नी निर्वाणी हिला दिले आहे. तो म्हणाला, निर्वाणी त्याची सर्वाच मोठी समीक्षक आहे आणि त्याची मार्गदर्शकही आहे. त्याच्या पत्नीनेच त्याला मैदानावर अधिक काळ घालवण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे त्याने त्याच्या खेळण्याच्या शैलीमध्ये बदल केला.
पत्नी मोठी टीकाकार आणि प्रशिक्षक – हेटमायर
सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) सामन्यापूर्वी हेटमायर आयपीएल प्रसारक स्टार स्पोर्ट्सशी बोलत होता. त्याने यावेळी सांगितले की, ‘ही गोष्ट फक्त स्वत:ला संधी देण्याबद्दल होती. मी पहिल्या दोन वर्षांत कधी स्थिर होण्यासाठी मला वेळ द्यावा याबद्दल विचार केला नव्हता. पण यावर्षी आणि गेल्यावर्षी मी स्वत:ला सांगितले की, परिस्थिती समजून घेण्यासाठी वेळ घ्यायचा.’
तो पुढे म्हणाला, ‘माझी पत्नी माझी सर्वात मोठी प्रशिक्षक आहे आणि माझी कठोर समीक्षक आहे. तिने मला सांगितले की, मी स्वत:ला वेळ देण्यासाठी काही चेंडू खेळावे, ज्यामुळे मी काय होत आहे, हे समजून घेऊ शकेल आणि मग शॉट्स खेळणे सुरू करेल.’
त्याचबरोबर हेटमायरने हे देखील सांगितले की, त्याला जोस बटलरप्रमाणे रिव्हर्स स्विप शॉट शिकायचा आहे. तो नेट्समध्ये त्याचा सराव देखील करत आहे. तसेच तो स्कूप शॉटचाही सराव करत आहे.
आयपीएल २०२२ मध्ये हेटमायरची चांगली कामगिरी
आयपीएल २०२२ आधी हेटमायरवर त्याच्या राष्ट्रीय संघाकडून फॉर्म आणि फिटनेसमुळे टीका झाली होती. तसेच आयपीएल लिलावातही त्याला खरेदी करण्यासाठी सुरुवातीला कोणी फार पसंती दाखवली नव्हती. पण नंतर राजस्थान रॉयल्सने त्याला ८.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आणि आपल्या संघाचा भाग बनवले.
हेटमायरनेही या संधीचा फायदा घेत आयपीएलच्या १५ व्या हंगामात शानदार कामगिरी केली. या हंगामात त्याने १० सामन्यांत ६५ च्या सरासरीने २६० धावा केल्या. यामध्ये त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
वडील करायचे सिलेंडर डिलेव्हरीचे काम, आता मुलगा आयपीएलमध्ये बनलाय केकेआरचा मॅच विनर
Oops Moment: चौकार आडवायला गेलेल्या अनुकूल रॉयची खाली घसरली ट्राऊझर आणि मग…