---Advertisement---

नदालचा असाही एक पराक्रम जो काल फारसा कुणाच्या ध्यानात आला नाही

On: सोमवार, जून 11, 2018 11:21 AM
---Advertisement---

पॅरिस | रविवारी स्पेनच्या राफेल नदालने विक्रमी ११ व्या फ्रेंच ओपन विजेतेपदाला गवसणी घातली. याबरोबर त्याने एक खास विक्रमही केली.

टेनिस जगतात तो १०० मिलीयन डाॅलर बक्षिस रकमेतून कमावणारा तिसरा खेळाडू ठरला. यापुर्वी नोवाक जोकोविच आणि राॅजर फेडरर यांनी हा पराक्रम केला आहे.

नोवाक जोकोविचने असा पराक्रम १ जून २०१६मध्ये फ्रेंच ओपन दरम्यानच केला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला टेनिसपटू ठरला होता.

नदालने टेनिसमध्ये बक्षिसांमधून १००,५६४, ५९८ अमेरिकन डाॅलर कमावले आहेत. फ्रेंच ओपन सुरु होण्यापुर्वी नदालने ९८,००१,५९८ अमेरिकन डाॅलर कमाई केली होती.

यावर्षी फ्रेंच ओपन विजेत्याला २.२५ मिलियन पौंड बक्षिस मिळाले. त्यामुळे तो हा आकडा पार करु शकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment