पुणे। एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए-नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12वर्षाखालील (7दिवसीय) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात क्वालिफायर युगंधर शास्त्री, अंशुल पुजारी, नमिश हूड या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
नवसह्याद्री क्रीडा संकुल येथील टेनिस कोर्टवर सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात नमिश हूड याने आपलाच राज्य सहकारी तिसऱ्या मानांकित क्रिशय तावडेचा 6-1, 7-5 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या बिगरमानांकीत युगंधर शास्त्रीने चौथ्या मानांकित आरव बेलेचा 6-1, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. अंशुल पुजारीने सहाव्या मानांकित वीर चत्तुरवर 6-0, 6-3 असा सनसनाटी विजय मिळवला. आर्यन किर्तने याने शौर्य बोऱ्हाडेचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली.
मुलींच्या गटात ओजसी देगमवार हिने अनिका नायरचा 6-0, 6-3असा तर, प्रांजली पांडुरेने रिया बांगलेचा 6-0, 6-2 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. याआधी स्पर्धेचे उदघाटन नवसह्याद्री सोसायटीचे चेअरमन सुरेंद्र गाडगीळ, नवसह्याद्री सोसायटीच्या क्रीडा समितीचे विनायक करमरकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे संचालक केतन धुमाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी): 12 वर्षांखालील मुले:
आरव पटेल(महाराष्ट्र)(1) वि.वि.कियान पटेल(महाराष्ट्र)6-4, 6-3;
नमिश हूड(महाराष्ट्र)वि.वि.क्रिशय तावडे(महाराष्ट्र)(3) 6-1, 7-5;
युगंधर शास्त्री(महाराष्ट्र)वि.वि.आरव बेले(महाराष्ट्र)(4) 6-1, 6-4;
ऋषिकेश माने(महाराष्ट्र)(5)वि.वि.दिव्यांश बेहरा(महाराष्ट्र)6-1, 6-2;
आर्यन किर्तने(महाराष्ट्र)वि.वि.शौर्य बोऱ्हाडे(महाराष्ट्र)6-0, 6-0;
अंशुल पुजारी(महाराष्ट्र)वि.वि.वीर चत्तुर(महाराष्ट्र)(6) 6-0, 6-3;
विश्वास चंद्रसेकरन(महाराष्ट्र)(7) वि.वि.नील देसाई(महाराष्ट्र)1-6, 6-2, 6-1;
राम मगदूम(महाराष्ट्र)(8) वि.वि.शौर्य गोडबोले(महाराष्ट्र)6-0, 6-0;
सय्यम पाटील(महाराष्ट्र)वि.वि.मिहीर काळे(महाराष्ट्र)6-2, 6-2;
सर्वज्ञ सरोदे(महाराष्ट्र)वि.वि.हर्ष परिहार(महाराष्ट्र)6-4, 6-2;
राघव सरोदे(महाराष्ट्र)वि.वि.कारव शहा(महाराष्ट्र)6-4, 6-3;
12वर्षांखालील मुली:
ओजसी देगमवार(महाराष्ट्र)वि.वि.अनिका नायर(महाराष्ट्र)6-0, 6-3;
प्रांजली पांडुरे(महाराष्ट्र)वि.वि.रिया बांगले(महाराष्ट्र)6-0, 6-2;
सान्वी राजू(महाराष्ट्र)वि.वि.रितू ग्यान(महाराष्ट्र)6-2, 6-0.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! वयाच्या २५ व्या वर्षीच ऍश्ले बार्टीचा टेनिसला गुडबाय, जागतिक क्रमवारीत होती अव्वल