पुणे (15 मार्च 2024) – आजच्या दिवसाचा तिसरा सामना नंदुरबार विरुद्ध नाशिक यांच्यात झाला. नंदुरबार संघाने 3 पैकी 3 विजय मिळवले होते तर नाशिक संघाने 3 पैकी 2 विजय मिळवले होते. नाशिक संघाने चांगली सुरुवात करत पहिल्या 3 मिनिटात 3 गुण मिळवले. त्यानंतर नंदुरबार संघाने पवन भोर ची पकड करत पहिला गुण मिळवला. 11 व्या मिनिटाला नाशिक संघाने नंदुरबार संघाला ऑल आऊट करत 12-04 अशी आघाडी मिळवली.
नाशिक कडून पवन भोर ने चढाईत चांगले गुण मिळवले. गणेश गीते ने बचावफळीत महत्वपूर्ण भूमिका निभावली. मध्यंतरा पर्यत 17-08 अशी नाशिक संघाकडे आघाडी होती. मध्यांतरा नंतर जयेश महाजन ने अष्टपैलू खेळ करत संघाची आघाडी कमी केली. नंदुरबार संघाने नाशिक संघाला ऑल आऊट करत सामन्यात चुरस वाढवली. दोन्ही संघांच्या चढाईपटू मध्ये चांगला खेळ बघायला मिळाला.
सामन्याची शेवटची 3 मिनिटे शिल्लक असताना 28-26 अशी नाममात्र 2 गुणांची आघाडी नाशिक संघाकडे होती. नंदुरबारच्या तिसऱ्या चढाईत जयेश महाजन ने 4 गुणांची सुपर रेड करत सामन्याला कलाटणी देत आघाडी मिळवली. नाशिकच्या शिल्लक राहिलेल्या एक खेळाडूला बाद करत नंदुरबार संघाने 33-28 निर्यायक आघाडी मिळवली. शेवटच्या क्षणी नंदुरबार संघाने 33-31 असा जिंकत सलग चौथा विजय मिळवला. (Nandurbar team defeated Nashik team in the match)
बेस्ट रेडर- जयेश महाजन, नंदुरबार
बेस्ट डिफेंडर- जयेश महाजन, नंदुरबार
कबड्डी का कमाल- जयेश महाजन, नंदुरबार
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या विजयासह पालघर संघ दुसऱ्या क्रमांकावर
तिसऱ्या विजयासह सांगली संघाची पहिल्या क्रमांकावर झेप