भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारी (9 मार्च) सुरू झाला. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीत गाणअयासाठी जेव्हा मैदानात आले, तेव्हा भारताचे पंतप्रथान नरेंद्र मोदी देखील यावेळी उपस्थित होते. भारतीय संघासोबत स्वतः मोदी राष्ट्रगीत गात असल्याने हा क्रिकेट विश्वातील याआधी कधीच न घडलेला प्रसंग होता. मोदींच्या साधीने स्टेडियममध्ये उपस्थित हजारो भारतीय चाहते राष्ट्रगीत म्हणत होते. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रपती अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) सध्या भारत दौऱ्यावर आहेत. अशात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या औचित्य साधून भारताचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानीज गुरुवारी सकाळी अहमदाबाद स्टेडियममध्ये उपस्थित होते. दोघेही राष्ट्रगीतवेळी आपल्या आपल्या संघासोबत राष्ट्रगीत गाताना दिसले. नरेंद्र मोदी आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच अशा प्रकारे एकत्र राष्ट्रगीत म्हणताना दिसले. नरेंद्र मोदींच्या शेजारी रोहित उभा असून त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) राष्ट्रगितासाठी उभा होता.
Best moment of the day – whole stadium singing the National Anthem of India. pic.twitter.com/ol0SeyryYb
— Johns. (@CricCrazyJohns) March 9, 2023
दरम्यान, उभय संघांत सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा आघाडीवर आहे. उभय संघांतील हा सामना जगातिल सर्वात मोठे स्टेडियम म्हणजेच, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील हा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना असून भारतासाठी विजय अतिशय महत्वाचा आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला अजून एका विजयाची गरज आहे. अशात ही अहमदाबाद कसोटी भारतला कुठल्याही परिस्थितीत जिंकावी लागेल.
(Narendra Modi attended the 4th Test match between India and Australia and sang the National Anthem with the team.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौथ्या कसोटीतून सिराजचा पत्ता का झाला कट? कॅप्टन रोहितने सांगितले कारण
IND vs AUS 4th Test : नाणेफेकीचा निकाल कांगारूंच्या पारड्यात, भारतीय संघात महत्त्वाचा एक बदल