पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका सोमवारी (9 जानेवारी) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना कराचीमध्ये खेळला गेला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याने या सामन्यात भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या पाच विकेट्स घेतल्या. नसीम शाहच्या या जबरदस्त प्रदर्शनामुळे न्यूझीलंड संघ कसाबसा 250 धावांचा टप्पा पार करू शकला. नसीमने सलग दुसऱ्या वनडे सामन्यात पाच विकेट्सचा हॉल घेतला असून एक खास विक्रम देखील नावावर केला.
न्यूझीलंड संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 255 धावा करू शकला. यातील पाच विकेट्स एकट्या नसीम शहा (Naseem Shah) याने घेतल्या. नसीमने टाकलेल्या 10 षटकांमध्ये 57 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 5 विकेट्स नावावर केल्या. हा नसीम शहान खेळलेला सलग दुसरा वनडे सामना आहे, ज्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या आहेत. मागच्या चार वनडे सामन्यांमधील त्याचे प्रदर्शन पाहिले, तर त्याने एक मोठा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे.
नसीम शहाने खेळलेल्या मागच्या चार वनडे सामन्यांमध्ये 15 विकेट्स नावावर केल्या आहेत. वनडे क्रिकेटच्या इतिहासात सलग चार सामन्यांमध्ये एखाद्या गोलंदाजीने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम यापूर्वी रायन हॅरिस आणि गॅरी गिलमोर या दोघांच्या नावावर होता. हॅरिस आणि गिलमोर यांनी सलग चार वनडे सामन्यांमध्ये प्रत्येकी 14-14 विकेट्स घेतल्या होत्या. नसीमने या सामन्यात केलेल्या गोलंदाजीचे काही व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायर होत आहेत.
— CricTracker (@Cricketracker) January 9, 2023
सलग चार एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत आता नसीम शाह 15 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर गॅरी गिलमर आणि चौथ्या क्रमांकावर रायन हॅरिस प्रत्येकी 14 विकेट्सह आहेत. चौथ्या क्रमांकावर मॅट हेन्री आणि पाचव्या क्रमांकावर मुस्तफिजूर रहमान आहे. जहूर खान यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. यादीतील शेवटच्या तीन गोलंदाजांनी चार वनडे सामन्यांमध्ये प्रत्येकी 13-13 विकेट्स घेतल्या आहेत.
Naseem Shah ( @iNaseemShah ) has taken 15 wickets the most after bowling in 4 ODIs. Previously Ryan Harris and Gary Gilmour had taken 14 wickets each from 4 matches. #PAKvNZ #CricketStats
— Shahzad Tirmizi Syed (@shahzadtirmizi) January 9, 2023
पहिल्या 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स:
15 – नसीम शाह
14 – गॅरी गिलमर
14 – रायन हॅरिस
13 – मॅट हेन्री
13 – मुस्तफिजुर रहमान
13 – जहूर खान
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याच्या विचार केला, तर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पाहुण्या न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम गोलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाकडून नसीम शाहपाठोपाठ उसामा मीर सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. उसामा मीरचा हा पदार्पणाचा सामना असून त्याने दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. मोहम्मद नवाझ आणि मोहम्मद वसीम यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (Naseem Shah’s world record, an unprecedented record in just four ODIs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या वनडेत कोण असणार टीम इंडियाचा सलामीवीर? रोहितने सांगितले नव्या साथीदाराचे नाव
भारताला मोठा धक्का! सहा वेळा जागतिक चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या मेरी कॉमची प्रमुख स्पर्धेतून माघार