पुणे ः आजपासून सुरु झालेल्या आंतर-जिल्हा फुटबॉल स्पर्धेत नाशिकने मोठ्या विजयाची नोंद केली. त्याचवेळी नांदेड आणि औरंगाबाद संघांनीही आपल्या मोहिमेस सुरुवात केली. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु आहे.
नाशिकने मोठा विजय मिळविताना गडचिरोलीचा ६-० असा पराभव केला. ओम फडतरेने दुसऱ्या, तर प्रदीप कनोजिया (३६वे मिनिट), अनुज लोखंडे (४५वे मिनिट), शुभम दायमा (५८वे मिनिट), अरुप कुमार (६५वे मिनिट), रेगी आढाव (७५वे मिनिट) यांनी गोल केले.
अन्य एका सामनयात नांदेडने १-१ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये अमरावतीचा ६-५ असा पराभव केला. नांदेडसाठी खलील खानने २४, तर समीर शेखने अमरावतीसाठी १५व्या मिनिटाला गोल केला. टायब्रेकरमध्ये नांदेडच्या मोहंमद रुफे, मोहंमद फैझल, अबीद खान, प्रदीप सुर्यवंशी, शुभम परमार, खलील खान यांनी आपले लक्ष्य अचूक साधले. अमरावतीकडून सुमार गावंडे सिद्धांत मोहोड, सईद सुफियान, रोहित मेश्राम यांनी जाळीचा अचूक वेध घेतला. समीर शेखला गोल करण्यात अपयश आले.
औरंगाबादनेही १-१ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये गोंदियाचा ४-२ असा पराभव केला.
निकाल
मैदान १: नाशिक : ६ (ओम फडतरे २रे; प्रदिप कनोजिया ३६वे; अनुज लोखंडे ४५वे शुभम दायमा ५८वे; अरुप कुमार ६३वे; रेगी
आढाव ७५वे मिनिट) वि.वि. गडचिरोली : ०
नांदेड : १ (६) (खलील खान २४वे मोहम्मद रुफे, मोहम्मद फैसल, आबीद खान, प्रदिप सुर्यवंशी, शुभम परमार, खलील खान) वि.वि. अमरावती : १ (५) (समीर शेख १५वे, सुमित गावंडे, प्रणय चार्ली, सिद्धांत मोहोद, सय्यद सुफियान, रोहित मेश्राम);
परभणी : 3 (अरबाज १ले, सिदिक १३वे; हुजैफा ६६वे मिनिट) वि.वि. सिंधुदुर्ग : १ (राज धुमाळे ६२वे मिनिट);
लातूर : ५ (शिवचंदर बामणकर ८वे; मधुर तिडोळे १८वे, ७२वे; मुझफ्फर शेख ४०+३वे; अनिकेत भडके ६६वे मिनिट) वि.वि. नंदुरबार : १ (चेतन माळी ४०वे मिनिट)
ग्राउंड-2 : औरंगाबाद : १(४) (याफई इम्रान बिम ७८वे मिनिट; सय्यद फजलुल हक, सय्यद रेहानमुद्दीन, सोहेल शेख, फैजुल) वि.वि.गोंदिया : १ (२) (भुवनेश शेंद्रे ४८वे; वासू कनोजिया, गौरव गंगभोज);
पालघर : १ (प्रग्नेश शेट्टी 80+1वे मिनिट) वि.वि. रायगड : 0;
वाशिम : २ (धीरज महल्ले ५वे; गौरव जोंधळ ४३वे मिनिट) वि.वि. उस्मानाबाद : ०
ठाणे: २ (स्वयं गोल ४०+१वे मिनिट, अभिजित शिंदे ५८वे मिनिट) वि.वि. नगर: ०
(Nashik, Nanded, Aurangabad wins Inter-District Football Tournament)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नशीब असावं तर असं! क्लिन बोल्ड होऊनही बाद झाला नाही श्रेयस अय्यर, पाहा व्हिडीओ
शेवटच्या वेळी जेव्हा केएल राहुल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार झालेला, तेव्हा निकाल काय होता?