मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये केवळ एकदाच यष्टीचीत झाला होता. 2001 साली इंग्लंड विरुद्ध बंगलोर येथे हा सामना खेळला गेला होता. नुकतेच तत्कालीन इंग्लंड कर्णधार नासिर हुसेन यांनी त्या सामन्याच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत.
एका वर्तमानपत्रात हुसेन यांनी सचिनला बाद करण्याच्या रणनीतीचा खुलासा केला आहे. हुसेन यांनी लिहिले ,”मी भारतात जाताना सचिनबद्दल काहीही रणनीती आखली नव्हती. हे सर्व काही त्या सामन्यादरम्यान घडले. भारतामध्ये खेळपट्टी ही फलंदाजीसाठी पोषक असल्याने मला एका चौकटीच्या बाहेर विचार करणे गरजेचे होते. बेंगलोर येथील सामन्यांमध्ये 90 टक्के खेळपट्टीचा भाग हा फलंदाजीसाठी उत्तम होतात. केवळ लेग स्टंपच्या बाहेर थोडेशी असमतोल जागा होती ज्याद्वारे फिरकीपटूंना मदत मिळत होती.”
हुसेन पुढे लिहितात, “मी विचार केला कि आमचा फिरकीपटू अॅशले गिल्सने कुठे गोलंदाजी करायला हवी. अखेर गिल्सने लेग स्टंपच्या बाहेर असलेल्या असमतोल जागी गोलंदाजी केली. त्यामुळे सचिन अस्वस्थ झाला आणि अखेर यष्टीचीत झाला.”
हुसेन यांनी खुलासा केलेला सामना 2001 साली बेंगलोर येथे झाला होता. या सामन्यात सचिन 90 धावांवर खेळत असताना एक आक्रमक फटका मारण्याच्या नादात यष्टीचीत झाला होता. सचिनच्या या यष्टीचीत होण्यावर तत्कालीन क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. यापुढे मात्र सचिनने अधिक मेहनत घेतली व आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये भविष्यात कधीही यष्टीचीत झाला नाही.
महत्वाच्या बातम्या:
मोहम्मद हफीजच्या टी10 लीग खेळण्यावर माजी पाकिस्तानी खेळाडूची कडाडून टीका
सचिनचे शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त ट्विट, चाहत्यांच्या आल्या संतप्त प्रतिक्रिया
BAN vs WI : शाकिबच्या अर्धशतकाने सावरला यजमानांचा डाव, दिवसाखेर ५ बाद २४५ धावांची मजल