भारत आणि इंग्लंड संघामध्ये ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे, याच मालिकेसह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वास सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड संघात होणाऱ्या मालिकेवर अनेक दिग्गजांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर या कसोटी मालिकेत कोणता संघ उत्कृष्ट कामगिरी करेल, याबद्दलही अनेक माजी क्रिकेटपटूंनी अंदाज व्यक्त केले आहेत. आता या मालिकेबद्दल ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू नॅथन हॉरिट्ज यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नॅथन हॉरिट्ज यांनी म्हटले आहे की, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅममध्ये खेळला जाणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना हॉरिट्ज म्हणाले की, ‘पंत हा एक गतिशील आणि आक्रमक खेळाडू आहे. जो खालच्या फळीत फलंदाजीने आपली पकड ठेवतो आणि हळूहळू आपल्याकडून सामना हिसकावून घेतो. वयानुसार तो पुढे विकसित होईल. वयानुसार त्यांच्यामध्ये परिपक्वता येईल आणि आशा आहे की ते त्यांच्याकडून होणाऱ्या चुकांमधून तो शिकेल.’
ऑस्ट्रेलियासाठी १७ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि ३ टी २० सामने हॉरिट्जने खेळले आहेत. ते म्हणाले आहे की, ‘मला वाटते की या मालिकेत गोलंदाज वर्चस्व निर्माण करतील. भारतीय फलंदाजांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. विराट जास्त काळ चांगली कामगिरी करणार नाही, अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. मला खात्री आहे की या मालिकेत तो चांगली कामगिरी करेल.’
नॉटिंगहॅममधील पहिल्या सामन्यानंतर, दुसरा सामना १२-१६ ऑगस्ट दरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. तर तिसरा सामना २५-२९ ऑगस्ट दरम्यान हेडिंग्लेमध्ये होणार आहे. चौथा २-६ सप्टेंबर केनिंग्टन ओव्हलवर होणार आहे. शेवटचा सामना १०-१४ सप्टेंबर दरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान ‘ही’ गोष्ट ठरेल महत्त्वाची, इंग्लिश क्रिकेटरनेच दिली प्रतिक्रिया
खुशखबर! १९७२ नंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये धडक; ग्रेट ब्रिटनवर ३-१ ने विजय