जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला धूळ चारल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आता ऍशेस 2023च्या तयारीत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळली जाणारी ही कसोटी मालिका पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत. ऍशेस मालिकेचे यजमानपद यावेळी इंग्लंडकडे आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज ऑफ स्पिनर नेथन लायन याच्याकडे एक मोठा विक्रम करण्याची संधी आघामी ऍशेस मालिकेत आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धा संघ आहेत. या दोन संघात सामना असला, तर जगभरातील प्रेक्षक तो पाहतात. अगदी त्याच पद्धतीने ऍशेस मालिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळली जात असली, तरी जगभरातील प्रेक्षकांकडून त्यांना प्रतिसाद मिळतो. यावर्षी ही पाच सामन्यांची कसोटी मालिका शुक्रवारी (16 जून) सुरू होत आहे. मागच्या वेळी इंग्लंडला 4-0 अशा पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी मात्र इंग्लिश खेळाडू मायदेशात खेळताना पराभवाचा पचपा काढण्याच्या प्रयत्नात असतील.
नेथन लायन (Nathan Lyon ) नेहमीच ऑस्ट्रेलियन संघासाठी महत्वाचा गोलंदाज राहिला आहे. लायन कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला विकेट मिळवून देण्यासाठी ओळखला जातो. यावेळीही इंग्लंडमध्ये ऍशेस खेळताना तो आपली कमाल दाखवू शकतो. लायनने जर अजून 13 कसोटी विकेट्स घेतल्या, आपल्या 500 कसोटी विकेट्स तो पूर्ण करेल. चाहत्यांना अपेक्षा आहे की, लायन ऍशेस 2023 (Ashes 2023) दरम्यानच हा मोठा विक्रम नावावर करेल. जर हे शक्य झाले, तर तो अशी कामगिरी करणारा आठवा गोलंदाज ठरेल. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 120 कसोटी सामन्यांमध्ये 31.03च्या सरासरीने 487 विकेट्स घेतल्या आहेत. (Nathan Lyon could reach 500 Test wickets in Ashes 2023)
कसोटी क्रिकेटमद्ये 500 विकेट्स घेणारे गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – 800 विकेट
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 708 विकेट
जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 685 विकेट
अनिल कुंबले (भारत) – 619 विकेट
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – 582 विकेट
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 563 विकेट
कर्टनी वॉल्श (वेस्टइंडीज) – 519 विकेट
महत्वाच्या बातम्या –
रोहितची जागा घेणार ‘हा’ युवा ओपनर! वेस्ट इंडीज दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता
मराठमोळ्या श्रेयांकाची अभिमानास्पद कामगिरी, फक्त 2 धावा खर्चून हाँगकाँगचा अर्धा संघ पाठवला तंबूत