ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नाथन लायन याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. लायन कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील काही महान फिरकीपटूंपैकी एक मानला जातो. असे असले तरी, काही फलंदाज असे आहेत, ज्यांना गोलंदाजी करणे लायनला देखील जड गेले. फिरकीपटूने स्वतः या तीन खेळाडूंची नावे सांगितली आहेत.
नाथन लायन (Nathan Lyon) याने आपल्या फिरकी चेंडूच्या जोरावर जगातील मोठ्या-मोठ्या फलंदाजांना अडचणीत टाकले. त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले नाहीत, असे क्वचितच फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहेत. अशाच काही खेळाडूंपैकी तीन फलंदाजांना चेंडू टाकणे लायनसाठी नेहमीच आव्हान ठरले. लायनने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्वतः या तीन फलंदाजांची नावे सांगितली. विशेष म्हणजे या तीन पैकी दोन नावे भारतीय आहेत.
सिडनी कसोटीपूर्वी सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओत लायन म्हणतो की, “काही कोणत्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसमोर मी गोलंदाजी केली आहे, हा खरोखर खूप कठीण प्रश्न आहे. होय मी काही महान फलंदाजांना गोलंदाजी केली आहे. मी त्याला तीन नावे देतो. ही नावे आहेत विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि एबी डिविलियर्स.” लायनच्या मते फलंदाज डिफेन्स करत असेल, तर त्याला आव्हान देत राहणे हाच गोलंदाजाकडे असणारा उपाय आहे. गोलंदाज असे करत राहिला, तरच त्याला यश मिळते.
दरम्यान, लायन सध्या जगातील महान गोलंदाजांपैकी एक आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात लायनने 500 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला. सिडनी कसोटीपूर्वी त्याच्या नावावर 505 विकेट्सची नोंद आहे. जगातील केवळ चार फिरकी गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स नावावर करू शकले. लायन यापैकी सर्वात नवखा आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे हे आधिपासून आहेत. लायन नुकताच 500 कसोटी विकेट्स घेणारा चौथ्या फिरकीपटू ठरला.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सिडनी कसोटी 3 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 360, तर दुसऱ्या सामन्यात 79 धावांनी विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून मालिकेत व्हाईट वॉश देण्याची संधी ऑस्ट्रेलियन संघाकडे आहे. त्यांचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यासाठी ही कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. (Nathan Lyon names the three best batsmen of his career)
महत्वाच्या बातम्या –
मुंबई खिलाडीसचा राजस्थान वॉरियर्सवर रोमहर्षक, तर तेलुगू योद्धासचा ओडिशा जगरनॉट्सवर निसटता विजय
बॉल टॅम्परिंक केल्याची कुठलीच खंत नाही! निवृत्तीची माहिती देताना वॉर्नर रोखठोकच बोलला