भारत सरकारकडून यावर्षीच्या क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा १२ खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. तसेच ३५ खेळाडूंची अर्जून पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
खरंतर याआधी २०२१ वर्षाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी ११ खेळाडूंना नामांकन देण्यात आले होते. पण नंतर या खेळाडूंच्या यादीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगचाही समावेश करण्यात आला. त्यामुळे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांची संख्या १२ झाली आहे.
क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२१ वर्षातील हा पुरस्कार वितरण सोहळा १३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात दुपारी ४.३० वाजता सुरु होईल.
प्रत्येकवर्षी खेलरत्न पुरस्कार दिला जातो. क्रिडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. यंदा हा पुरस्कार १२ खेळाडूंना मिळणार असून यामध्ये भारताचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज, हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश, ऑलिंपिक रौप्यपदक विजेता रवी दहिया, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री असे दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
यंदा ३५ खेळाडूंना अर्जून पुरस्कार दिला जाणारा असून यामध्ये दिग्गज भारतीय सलमीवीर शिखर धवन, पॅरा टेबल टेनिस खेळाडू भाविना पटेल, पॅरा बॅडमिंटन खेळाडू सुहास यथिराज आणि उंच उडीमधील निषाद कुमार यांच्या नावांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या हॉकी संघाच्या सर्व खेळाडूंनाही अर्जून पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
याशिवाय द्रोणाचार्य पुरस्कारासाठी १० प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामधील ५ जणांची द्रोणाचार्य जीवनगौरव श्रेणीतील पुरस्कारासाठी आणि ५ जणांची नियमीत द्रोणाचार्य श्रेणीतील पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
याव्यतिरिक्त क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी ५ जणांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार विजत्यांची यादी –
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार – नीरज चोप्रा (ऍथलेटिक्स), रवी कुमार (कुस्ती), लोव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), पीआर श्रीजेश (हॉकी), अवनी लेखरा (पॅरा नेमबाजी), सुमित अंतिल (पॅरा ऍथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), कृष्णा नागर (पॅरा बॅडमिंटन) मनीष नरवाल (पॅरा नेमबाजी), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल), मनप्रीत सिंग (हॉकी).
अर्जून पुरस्कार – अरपिंदर सिंग (ऍथलेटिक्स), सिमरनजीत कौर (बॉक्सिंग), शिखर धवन (क्रिकेट), सीए भवानी देवी (तलवारबाजी), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी उत्तम परब (मल्लखांब), अभिषेक वर्मा (नेमबाजी), अंकिता रैना (टेनिस), दीपक पुनिया (कुस्ती), दिलप्रीत सिंग (हॉकी), हरमनप्रीत सिंग (हॉकी), रुपिंदर पाल सिंग (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी),अमित रोहिदास (हॉकी), विरेंद्र लाक्रा. (हॉकी), सुमित (हॉकी), नीलकांत शर्मा (हॉकी), हार्दिक सिंग (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरजंत सिंग (हॉकी), मनदीप सिंग (हॉकी), शमशेर सिंग (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंग (हॉकी), योगेश कथुनिया (पॅरा ऍथलेटिक्स), निषाद कुमार (पॅरा ऍथलेटिक्स), प्रवीण कुमार (पॅरा ऍथलेटिक्स), सुहाश यथिराज (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अधना (पॅरा नेमबाजी), भाविना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंग (पॅरा तिरंदाजी) आणि शरद कुमार (पॅरा ऍथलेटिक्स).
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) – टी. पी. ओसेफ (ऍथलेटिक्स), सरकार तलवार (क्रिकेट), सरपाल सिंग (हॉकी), आशा कुमार (कबड्डी) तपन कुमार पाणिग्रही (जलतरण)
द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित) – राधाकृष्णन नायर पी (ऍथलेटिक्स), संध्या गुरुंग (बॉक्सिंग), प्रीतम सिवाच (हॉकी), जय प्रकाश नौटियाल (पॅरा नेमबाजी), सुब्रमण्यम रमण (टेबल टेनिस)
जीनवगौरव पुरस्कार – लेख के.सी. (बॉक्सिंग), अभिजित कुंटे (बुद्धिबळ), दविंदर सिंग गर्चा (हॉकी), विकास कुमार (कबड्डी), सज्जन सिंग (कुस्ती).
महत्त्वाच्या बातम्या –
– आनंदाची बातमी! मिताली राजला खेलरत्न पुरस्कार, तर शिखरलाही मिळणार मोठा पुरस्कार
जोडी नंबर १! रोहित-शिखरच्या जोडीला भारी ठरली आझम-रिझवानची जोडी, ‘या’ यादीत मिळवले अव्वल स्थान
‘ब्रेकअप झालाय का?’ शुबमन गिलच्या ‘या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण