इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये वाद पेटला आहे. त्याचे कारण म्हणजे, लखनौ सुपर जायंट्सचा युवा वेगवान गोलंदाज नवीन उल हक आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अनुभवी फलंदाज विराट कोहली यांच्यात हा वाद निर्माण झाला. सामन्यादरम्यान कोहली आणि नवीन यांच्यात हाणामारी झाली. मॅच संपल्यानंतर हस्तांदोलन करताना देखील त्यांच्यात वाद निर्माण झाला. या भांडणामध्ये लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरनेही उडी घेतली. आता नवीनने याबाबत आपले म्हणणे मांडले असून तो कधीही कोणाला चुकीचे बोलत नाही किंवा चुकीचे ऐकत नाही, असे म्हटले आहे.
व्हिडीओ झाला व्हायरल
भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र, नवीन फलंदाजी करत असताना याची सुरुवात झालीआणि त्यानंतर कोहलीचा त्याच्याशी वाद सुरु झाला. नवीनने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सामना संपल्यानंतर कोहलीने त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि तो काय म्हणाला हा व्हिडिओ देखील आहे.
नवीन वर प्रभाव
या वादानंतर नवीन कोहलीच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. जेव्हा तो मैदानावर यायचा तेव्हा प्रेक्षक कोहली-कोहलीच्या घोषणा देत असत. नवीनने सांगितले की, “याचा त्याच्यावर परिणाम झाला आणि या लोकांना गप्प कसे करायचे याचा तो विचार करू लागला.” आपले पूर्ण लक्ष खेळावर असल्याचे त्याने सांगितले आणि त्याच बरोबर त्याचा स्वत:वर विश्वास आहे. नवीन सोशल मीडियावरही लोकांच्या निशाण्यावर होता. तो म्हणाला की, “यादरम्यान त्याने स्वतःला समजावून सांगितले की, जेव्हा तो इतका लांब आला तेव्हा काहीही झाले तरी तो खेळू शकतो.
Energy to Naveen Ul Haq main zyada dekhi hye hum nay???? pic.twitter.com/AzNXRiU4L6
— Ahmad Hassan Bobak (@ahmad_bobak) June 7, 2023
Another angle of the Virat Kohli vs Gautam Gambhir argument and Naveen Ul Haq having some with King Kohli too. #IPL2023 pic.twitter.com/gVLQXdNXsI
— Farid Khan (@_FaridKhan) May 1, 2023
Naveen ul haq Said I know I did mistake to mess with legend cricketer Virat Kohli and I apologise for my mistake to his fans and people of India too pic.twitter.com/RMS6k8Ecdw
— Kevin (@imkevin149) May 3, 2023
Virat Kohli & Gautam Gambhir have been fined 100% of match fees and Naveen Ul Haq has been fined 50% of match fees for breaching IPL code of conduct. pic.twitter.com/ya6b31IZ45
— Johns. (@CricCrazyJohns) May 2, 2023
सोशल मीडियावर ओढले नाही
जेव्हा नवीनला विचारण्यात आले की, त्याने हा वाद सोशल मीडियावर ओढण्याचा प्रयत्न केला का? त्यामुळे त्याने स्पष्ट नकार दिला. नवीनने त्याच्या इंस्टाग्रामवर आंब्याचा फोटो पोस्ट केला होता, ज्यासाठी तो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. हा वाद सोशल मीडियावर आणण्याचा प्रयत्न केला नसल्याचे नवीनने यावेळी म्हटले. नवीनने कोणाचेही नाव न घेता केवळ आंब्यांचा आस्वाद घेतल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती; 39 वर्षांनंतर घडला ‘हा’ योगायोग
मस्तच! 5 चेंडूत 5 षटकार ठोकत अलिशान शराफूची रिंकू सिंगला टक्कर, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?