---Advertisement---

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची मोठी ‘स्वप्नपूर्ती’; आई-वडिलांना पहिल्यांचा घडवला विमानप्रवास, पाहा फोटो

On: शनिवार, सप्टेंबर 11, 2021 10:26 PM
---Advertisement---

भारताचा टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने अजून एका स्वप्नाला गवसणी घातली आहे. मध्यमवर्गीय परिवारातून येणाऱ्या निराजने आपल्या आई-वडिलांना पहिल्यांदा विमानातून प्रवास करवून आणला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमानाने मान उंच करायला लावणाऱ्या नीरजच्या या गोड यशाने, तो पुन्हा समस्त भारतीयांच्या कौतुकास पात्र ठरला आहे.

नीरज चोप्राने शनिवार, ११ सप्टेंबर रोजी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. ‘आज आयुष्यातील आणखी एक स्वप्न पूर्ण झालं. आई-वडिलांना पहिल्यांदा विमानप्रवास करून आणला. सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादासाठी नेहमीच आभारी असेन’, असं नीरजने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. ट्विटमध्ये त्याने आई वडिलांसोबतचे फोटो ही शेअर केले आहेत.

मध्यंतरी भारताचा गोल्डन बॉय आणि त्याचे कुटुंबीय सध्या खूप अस्वस्थ होते. कारण सततच्या अभिनंदन सोहळ्यामुळे नीरज खूप थकला होता. तो इतका अस्वस्थ झाला की त्याला एक कार्यक्रम अर्ध्यात सोडावा लागला होता. टोकियोहून आल्यानंतर, लागोपाठ कार्यक्रमांमध्ये सहभागी होत गेल्याने त्याची प्रकृती खालावली होती.

त्याच्या कुटुंबाच्या मते, यासगळ्याचा नीरजच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होत होता. तो २-३ तासांपेक्षा जास्त झोपू शकत नसल्यामुळे त्याची तब्येत बिघडली होती.

तत्पूर्वी, २३ वर्षीय नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. नीरज चोप्राने तडाखेबंद सुरुवात पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मी इतका दूर भाला फेकला होता. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८७.५८ मी इतका लांब भाला फेकून करून आपलं नाव पहिल्या स्थानावर कायम ठेवलं. तिसऱ्या प्रयत्नात ७६.७९ मीटर दूर भाला फेकला, पण त्याचा दुसरा प्रयत्न सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी पुरेसा ठरला. त्यानंतर त्याचे इतर प्रयत्न बाद ठरले. त्यामुळे त्याचा ८४ मीटर लांबीचा सहावा प्रयत्न केवळ औपचारिकता ठरली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं आणि एकमेव सुवर्णपदक ठरलं. तसेच ऑलम्पिकमधील भारताचे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. याआधी अभिनव बिंद्राने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमुळे पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय मालिकेला फटका; डीआरएसशिवाय खेळावे लागणार सामने

मँचेस्टर कसोटी रद्द होण्याचा आयपीएलशी संबंध, इंग्लिश मीडियाचे भारतीय खेळाडूंवर आरोप

आयपीएलवरही कोरोनाचे संकट; इंग्लंड दौऱ्यात खेळलेल्या या ६ खेळाडूंवर बीसीसीआयची करडी नजर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---