भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने झुरिक डायंमड स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. काही दिवसांपूर्वी अॅथलेटिक्स विश्वचषक बुडापेस्टमध्ये 88.17 मीटरमध्ये सुवर्णपदक नीरजने सुवर्णपदक पटकवले होते. यामुळे त्याने झुरिक डायंमड स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकावे अशी आशा सर्वांनाच होती. मात्र, फक्त काही सेंटीमीटर दुर भाला फेकल्यामुळे नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रान (Neeraj Chopra) याने झुरिक डायमंड स्पर्धेत 85.71 मीटरची सर्वोत्तम भाला फेक केली. त्याचवेळी या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेचने 85.86 मीटर फेक केली. या स्पर्धेत नीरजने पहिले तीन प्रयत्न फाऊल केले. चौथ्या प्रयत्नात नीरजने ८५.२२ मीटरवर भाला फेकला.
यानंतर पाचव्या प्रयत्नात नीरजने पुन्हा फाऊल केला. नीरजने शेवटच्या प्रयत्नात 85.71 मीटर फेक केला. यामुळे या स्पर्धेत त्याला दुसरे स्थान मिळवण्यात यश आले. याआधी नीरजने दोहा आणि लुसाने येथे झालेल्या डायमंड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यासह भारताच्या स्टार खेळडूने डायमंड स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठीही पात्रता मिळवली आहे.
डामंड स्पर्धेचा अंतिम सामना 16 आणि 17 रोेजी अमेरिकेत खेळवला जाणारा आहे. या स्पर्धेत 6 अव्वल भालाफेकपटूंनी डायमंड स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे, ज्यामध्ये नीरज तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या वडलेच पहिल्या स्थानावर आहे तर जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसऱ्या स्थानावर आहे.
डायमंड लीगचा अंतिम सामना 16 आणि 17 सप्टेंबर रोजी यूजीन, अमेरिकेत खेळवला जाईल. गेल्या वेळी नीरजने ही स्पर्धा जिंकली होती. या 6 अव्वल भालाफेकपटूंनी डायमंड लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे, ज्यामध्ये नीरज तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या वडलेच पहिल्या स्थानावर आहे तर जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसऱ्या स्थानावर आहे.
नीरज डायमंड स्पर्धेचा मोनॅको लेग खेळू शकला नाही. या कारणास्तव तो 23 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. नीरजशिवाय भारताचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकर याने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत ७.९९ मीटर उडी मारली आहे. (neeraj chopra win silver medal in zurich dimond league)
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप तिकीट बुकिंगचा सावळागोंधळ! वेबसाईट क्रॅश, चाहत्यांनी व्यक्त केला संताप
Asia Cup 2023: भारताची पल्लेकेले मैदानातील आकडेवारी ‘लईच भारी’, पाकिस्तानने ‘या’ 2 धुरंधरांपासून राहावे सावध