येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. या मोठ्या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंड संघातील गोलंदाजाने भारतीय संघाला चेतावणी दिली आहे.
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ या सामन्यात विजयासाठी बरोबरीचे दावेदार आहेत. कारण दोन्ही संघात उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आहेत. त्यामुळे चाहत्यांना चुरशीची लढत पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. अशातच न्यूझीलंड संघासाठी ५१ कसोटी सामन्यात २१९ गडी बाद करणाऱ्या नील वॅगनरने भारतीय संघाला चेतावणी दिली आहे. त्याने म्हटले की,विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना माझ्यासाठी, विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यासारखा असणार आहे. ”
ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार नील वॅगनरने म्हटले आहे की, “होय, हे माझ्यासाठी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासारखेच आहे. माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी निराशा म्हणजे न्यूझीलंड संघाकडून मी कधीही मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळू शकलो नाही. तसेच टी -२० किंवा वनडे संघात मला कधीही स्थान मिळाले नाही. आता माझ्याकडे एक चांगली संधी आहे आणि मला वाटत नाही की, अशी संधी मला पुन्हा मिळेल. माझ्यादृष्टीने आता माझे लक्ष फक्त कसोटी क्रिकेटवर केंद्रित करायचे आहे आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणे माझ्यासाठी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीसारखे आहे.”
भारतीय संघ सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला माहित आहे की, हा पहिला अंतिम सामना आहे. त्यामुळे याबरोबर फारसा इतिहास जोडलेला नाहीये. परंतु ही एक मोठी सुरुवात आहे. भारतीय संघ विश्वातील सर्वोत्कृष्ट संघापैकी एक आहे. त्यांच्या विरुद्ध कसोटी सामना खेळणे ही उच्च पातळीवर स्वतःची चाचणी करून घेण्याची उत्तम संधी आहे. खरोखरच हे रोमांचक असेल, परंतु मला हे इतर कसोटी सामन्यासारखे घ्यायचे आहे, हा खरोखर एक मोठा सामना असेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला व्हायचे होते क्रिकेटपटू; धवनसोबत खेळला आहे क्रिकेट, विराटचाही चांगला मित्र
केकेआरला मोठा फटका! ‘हा’ प्रमुख परदेशी खेळाडू खेळणार नाही उर्वरित आयपीएल २०२१ चे सामने
बुमराहच्या पोस्टवर अक्षर पटेलची मजेशीर कमेंट, मिर्झापूरचा संवाद वापरत म्हणाला…