आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछाने याने वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर बला’त्काराचा आरोप होता. मात्र, नंतर त्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला. आता हा 22 वर्षीय खेळाडू वनडे क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी आपले पान लिहीत आहे. संदीपने वनडे क्रिकेटमध्ये जो कारनामा केला आहे, त्या जोरावर त्याने वनडे क्रिकेटमधील अनेक दिग्गज गोलंदाजांनाही पछाडले आहे. संदीपने ही कामगिरी ओमान संघाविरुद्ध केली आहे. चला तर संदीपने कोणता विक्रम केला आहे, जाणून घेऊयात.
सर्वात वेगवान 100 विकेट्स घेणारा गोलंदाज
शुक्रवारी (दि. 21 एप्रिल) नेपाळच्या कीर्तीपूर येथील त्रिभूवन युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल क्रिकेट मैदानात नेपाळ विरुद्ध ओमान संघात वनडे सामना पार पडला. या सामन्यात संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याने त्याच्या वनडे क्रिकेटमधील 100 विकेट्स पूर्ण केल्या. संदीप हा वनडेत सर्वात वेगवान 100 विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने अवघ्या 42 व्या सामन्यात ही कामगिरी करून दाखवली आहे. आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर त्याने नेपाळचा विजय सोपा केला आहे.
History in ODI format.
Sandeep Lamichhane becomes the fastest bowler to complete 100 wickets in ODI, he took just 42 matches to achieve this.
One of the Greats in Nepal cricket. pic.twitter.com/UnABG7odUt
— Johns. (@CricCrazyJohns) April 21, 2023
राशिद खानचा विक्रम मोडला
संदीप लामिछाने याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 100 विकेट्स घेण्याच्या बाबतीत राशिद खान (Rashid Khan) याला मागे टाकले आहे. राशिदने 44 वनडे सामन्यात 100 विकेट्स घेतल्या होत्या. आता त्याचे स्थान या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचले आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी मिचेल स्टार्क आहे. त्याने 52 सामन्यात 100 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सकलेन मुश्ताक असून त्याने 53 सामन्यात ही कामगिरी केली होती. तसेच, 5व्या स्थानी इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड आहे. त्याने 54 सामन्यात 100 विकेट्स घेतल्या होत्या.
आयपीएलमध्येही झळकलाय संदीप
संदीप याने आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचेही नेतृत्व केले आहे. संदीपने दिल्लीकडून 9 सामन्यात 13 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. 2020पर्यंत आयपीएलसह जगभरातील प्रतिष्ठित टी20 लीगमध्येही संदीप खेळतो. याव्यतिरिक्त त्याने नेपाळसाठी 42 वनडे सामन्यात 100 हून अधिक विकेट्स घेण्यासोबतच 44 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 85 विकेट्सही घेतल्या आहेत. (Nepal cricketer sandeep lamichhane become the fastest bowler to reach 100 wickets in odi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचा मोठा निर्णय! Asian Gamesमध्ये भारतीय संघ पाठवण्यास दिला थेट नकार, कारण घ्या जाणून
पाच पराभवांनी गांगुलीची हवा झालेली टाईट, दिल्लीने विजय मिळवताच म्हणाला, ‘माझी पहिल्या कसोटीतील धाव…’