वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सातवा सामना सोमवारी (9 ऑक्टोबर) हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड संघ आमने-सामने आले. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर नेदरलँडच्या दोन्ही गोलंदाजांनी अविश्वसनीय सुरुवात करत 48 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली.
पात्रता फेरीत शानदार कामगिरी करून आलेल्या नेदरलँड्सला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागले होत. मात्र, त्या सामन्यात त्यांनी चांगली झुंज दिली होती. त्यानंतर आता या दुसऱ्या सामन्यात उतरल्यावर पहिल्या तीन षटकातच त्यांनी एक मोठा विक्रम बनवला. या सामन्यात न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर डेवॉन कॉनवे व विल यंग यांना सुरुवातीला अपेक्षित कामगिरी करता आले नाही. नेदरलँड्सचा युवा फिरकीपटू आर्यन दत्त याने पहिले व तिसरे आणि रायन क्लेन याने दुसरे षटक निर्धाव टाकले. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या तीन षटकात एकही धाव करता आले नाही.
यापूर्वी अशी कामगिरी 1975 विश्वचषकात झालेली. विश्वचषकातील हा पहिलाच सामना होता ज्यामध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताविरुद्ध ही कामगिरी केलेली.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड
डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
नेदरलँड
विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सीब्रँड एंजेलब्रेच, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
(Netherlands Bowl First Three Overs Maiden Against Newzealand In World Cup Match)