नेदरलॅंड क्रिकेट संघाचा (netherland cricket team) फलंदाज बेन कूपर (ben cooper) याने शनिवारी (२९ जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी त्याने हा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट करत कुपरने निवृत्तीची माहिती दिली.
सोशल मीडियावर दिली निवृत्तीची माहिती
कूपरने लिहिले की, “आज (शनिवार) मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. आठ वर्ष केशरी रंगाची जर्सी परिधान करणे आणि नेदरलॅंडचे प्रतिनिधित्व करणे अभिमानाची गोष्ट होती. हा काळ चढ – उतार आणि विशेष क्षणांनी भरलेला होता. मी काहीच बदलू शकत नाही. मी माझ्या काळातील सर्वोत्तम आठवणी म्हणून त्याकडे मागे वळून पाहील.”
पोस्टमध्ये त्याने नेदरलॅंड क्रिकेट बोर्डला धन्यवाद दिले आहे. त्याने लिहिले की, “लहानपणीचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी देण्यासाठी नेदरलॅंड क्रिकेट बोर्डचे धन्यवाद. नेदरलॅंड संघातील माझे सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षक यांना चांगल्या आठवणींसाठी धन्यवाद. मी ड्रेसिंग रूममध्ये तुमच्यापेक्षा चांगल्या व्यक्तिंची अपेक्षा ठेऊ शकत नाही. मला यात कसलीच शंका नाहीय की, सध्याचा संघ आणि जी गुणवत्ता येत आहे, ती नेदरलॅंड क्रिकेटला नवीन उंची मिळवून देईल.”
Thanks to everyone who’s supported me throughout my journey with @KNCBcricket it’s been unreal but it’s time for me to move on in to the next stage of my life. pic.twitter.com/aBS8FPHmwC
— Ben N Cooper (@bencooper_32) January 29, 2022
कूपरने अलिकडच्या काळात दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून स्वतःचे नाव मागे घेतले होते आणि आता अचानक हा निर्णय घोतला आहे. कूपर टी२० मध्ये तो नेदरलॅंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने नेदरलॅंडसाठी खेळलेल्या ५८ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २८ च्या सरासरीने १२३९ धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १३ सामने खेळले, ज्यामध्ये १८७ धावा केल्या.
कूपरने नेदरलॅंडसाठी त्याच्या कारकिर्दीची सुरुवात कॅनडामध्ये २०१३ साली केली होती. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमधल्या चार सामन्यात त्याने ७५.१६ च्या सरासरीने ४५१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १७३ होती.
महत्वाच्या बातम्या –
शाहीन आफ्रिदीने ‘ड्रीम हॅट्रीक’ साठी घेतली ‘या’ तीन भारतीय खेळाडूंची नावे; म्हणाला…
व्हिडिओ पाहा –