विश्वचषक 2023 स्पर्धेतील अखेरचा सामना 12 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात बंगळुरू येथे पार पडणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी नेदरलँड्स क्रिकेट संघाशी संबंधित आहे. संघाचा खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशात त्याच्या जागी संघाने दुसऱ्या खेळाडूचीही घोषणा केली आहे. चला तर, कोण आहे तो खेळाडू जाणून घेऊयात…
रविवारच्या सामन्यापूर्वी नेदरलँड्स संघाने आपल्या ताफ्यात एक मोठा बदल केला. पाठीच्या दुखापतीमुळे संघाचा वेगवान गोलंदाज रायन क्लीन (Ryan Klein) हा 15 सदस्यीय संघातून बाहेर पडला आहे. अशात त्याच्या जागी युवा फलंदाज नोआ क्रोस (Noah Croes) याची वर्णी लागली आहे. गुरुवारी (दि. 09 नोव्हेंबर) टूर्नामेंट इव्हेंट टेक्निकल कमिटीने या बदलास मान्यता दिली. त्यामुळ आता याचा अर्थ क्रोस रविवारी बंगळुरूमध्ये अजिंक्य भारताविरुद्ध खेळू शकेल.
🚨Netherlands replacement named ahead of India clash as pacer Ryan Klein is ruled out of #CWC23.
Details 👇https://t.co/lwLtLQAstE
— ICC (@ICC) November 9, 2023
क्रोस याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो आपल्या देशासाठी फक्त 1 वनडे सामना खेळला आहे. 23 वर्षीय क्रोसने जुलै महिन्यात पार पडलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक क्वालिफायर सामन्यांमध्ये श्रीलंकेविरुद्ध संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी त्याला फक्त 7 धावा करता आल्या होत्या.
दुसरीकडे, क्लीन याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्याला नेदरलँड्सकडून या स्पर्धेत फक्त 1 सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने 9 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे न्यूझीलंडविरुद्ध 7 षटके गोलंदाजी केली. यावेळी त्याने 41 धावा खर्च केल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. तसेच, फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून फक्त 8 धावा निघाल्या.
नेदरलँड्सचे प्रदर्शन
नेदरलँड्स संघाच्या स्पर्धेतील प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यांनी 8 पैकी 2 सामने जिंकत 6 सामने गमावले आहेत. अशात भारताविरुद्ध होणारा सामना जिंकून ते पॉईंट्स टेबलमध्ये आठवे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून त्यांना 2025मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्वालिफाय करता येईल.
नेदरलँड्स संघ
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डौड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, नोआ क्रोस, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, सीब्रँड एंगेलब्रेच (Netherlands make squad change ahead of World Cup 2023 clash with India Read)
हेही वाचा-
भारत-श्रीलंका सामन्यात मॅच फिक्सिंग? संसदेत गदारोळ, जयवर्धनेच्या भूमिकेवर शंका
खुशखबर! वर्ल्डकप सेमीफायनल आणि फायनलच्या तिकिटांबाबत मोठी अपडेट, कुठे आणि कसे कराल खरेदी? घ्या जाणून