---Advertisement---

बॉलर नहीं, फिनिशर हू मैं! अश्विनने राजस्थानला मिळवून दिलं ‘क्वालिफायर १’चं तिकीट, होतंय कौतुक

R-Ashwin
---Advertisement---

 राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेला साखळी फेरीतील ६८वा सामना संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील संघाने ५ विकेट्स राखून जिंकला. या विजयासह राजस्थानने थेट पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी आपला दावा ठोकला आहे. राजस्थानच्या या विजयाचा नायक राहिला फिरकीपटू आर अश्विन. चेन्नईविरुद्ध मॅच विनिंग खेळी करत त्याने संघाला घवघवीत यश प्राप्ती करून दिली आहे. यानंतर क्रिकेट चाहत्यांकडून अश्विनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

चेन्नई विरुद्ध राजस्थान सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने १९.४ षटकात ५ विकेट्स गमावत चेन्नईचे लक्ष्य पूर्ण केले.

चेन्नईच्या १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने धुव्वादार अर्धशतक केले. ४४ चेंडू खेळताना त्याने १ षटकार आणि ८ चौकारांच्या ५९ धावांची शानदार खेळी केली. मात्र त्यानंतर राजस्थानची मधली फळी कोलमडली. अशात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अश्विनने नाबाद ४० धावांची धडाकेबाज खेळी केली. अवघे २३ चेंडू खेळताना ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने ही मॅच विनिंग खेळी केली.

त्याच्या या योगदानामुळे राजस्थानने २ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला व नेट रन रेटच्या जोरावर पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी पात्रताही मिळवली. पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानचा प्रतिस्पर्धी गुजरात टायटन्स संघ असेल. या महत्वपूर्ण खेळीनंतर अश्विनचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हर्षा भोगलेंपासून ते क्रिकेट चाहत्यांपर्यंत सर्वांनी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

https://twitter.com/rajasthanroyals/status/1527710093114249216?s=20&t=Rwj70ccQL0G820OQteYahA

https://twitter.com/Being_indiawale/status/1527712591820505088?s=20&t=-4hI45C9boh3hwx43QCg0A

राजस्थानकडे थेट अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी
आता २४ मे रोजी, कोलकाता येथे राजस्थान विरुद्ध गुजरात (Rajasthan Royals vs Gujrat Titans) संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना होईल. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघासोबत दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. हा दुसरा क्लालिफायर सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात जाईल.

अशात आता २००८ आयपीएलचा विजेता राजस्थान हा कारनामा करून दाखवेल की नाही, यावर क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘धोनीच आहे त्याच्या संघाचा खलनायक’, राजस्थानविरुद्धच्या मंद फलंदाजीमुळे ‘माही’ नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल

आयपीएलच्या पॉवरप्लेमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या फलंदाजांमध्ये मोईन भाऊंचाही नंबर, पाहा किती धावा चोपल्यात

जयस्वालचे अर्धशतक, तर अश्विनची झुंजार खेळी; चेन्नईला पराभूत करत राजस्थान प्लेऑफसाठी क्वालिफाय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---