रविवारचा (दि. 19 नोव्हेंबर) दिवस ऑस्ट्रेलिया संघाच्या नावावर झाला. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वचषक विजेता बनला. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे भारताचे तिसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही तुटले. मागील 10 वर्षांपासून भारत आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाहीये. या सामन्यात भारताकडे चांगली संधी होती, पण तीही हातातून निसटली. चला तर, भारत 2013 पासून आयसीसीच्या कोणकोणत्या स्पर्धांमध्ये पराभूत झालाय, पाहूयात…
भारतीय संघ (Team India) या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्व विकेट्स गमावून फक्त 240 धावा केल्या होत्या. भारताचे हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात 241 धावा करून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात ट्रेविस हेडने 137 धावा आणि मार्नस लॅब्युशेनने नाबाद 58 धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने (Australia won by 6 wickets) हा सामना आपल्या खिशात घातला.
भारतीय संघ 2013पासून जिंकून शकला नाही आयसीसी ट्रॉफी
भारताने अखेरची आयसीसी ट्रॉफी 2013मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात जिंकली होती. यावेळी भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी होता. मात्र, त्यानंतर भारत आयसीसीच्या आयसीसी ट्रॉफीच्या बादफेरीत 9 वेळा पोहोचला, पण विजय मिळवण्यात नेहमीच अपयशी ठरला.
साल 2014च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या हातून पराभूत झाला होता. त्यानंतर 2015च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने पराभवाचा धक्का दिला होता. 2016च्या टी20 विश्वचषक उपांत्य सामन्यात भारताला वेस्ट इंडिजने पराभूत केले होते. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. 2019च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.
तसेच, 2021च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातही भारताचा न्यूझीलंडनेच पराभव केला होता. पुढे 2022च्या टी20 विश्वचषक उपांत्य सामन्यात भारत इंग्लंडच्या हातून पराभूत झाला होता. त्यानंतर 2023मध्ये भारत डब्ल्यूटीसी आणि विश्वचषक या दोन्ही आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभूत झाला. (never ending pain of india team India in ICC events since 2013)
आयसीसी स्पर्धांमध्ये सन 2013पासून भारतीय संघ-
2014च्या टी20 अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पराभूत
2015च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत
2016च्या टी20 विश्वचषक उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभूत
2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत
2019च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत
2021च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत
2022च्या टी20 विश्वचषक उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभूत
2023च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत
2023च्या विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत*
हेही वाचा-
CWC 2023 मध्ये भारतीय गोलंदाजांनी घडवला इतिहास! रोहितसेनेकडून ऑस्ट्रेलियाचा 16 वर्षे जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त
World Cup Final मध्ये भारत आघाडीवर! 10 षटकातच ऑस्ट्रेलियाची हालत खस्ता, शमी-बुमराह बरसले