वेलिंग्टन। काल (31 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात चौथा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेतली. विशेष म्हणजे या मालिकेत सलग दुसऱ्यांदा भारताने सुपर ओव्हमध्ये विजय मिळवला.
या टी20 मालिकेत तिसऱ्या सामन्यातही बरोबरी झाल्याने सुपर ओव्हर झाली होती. या सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला होता.
या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला सामन्याचे 40 वे षटक (न्यूझीलंडच्या डावाचे 20 वे षटक) महागात पडले. या टी20 मालिकेत सुपर ओव्हर झालेल्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला निर्धारित शेवटच्या षटकात 10 पेक्षा कमी धावांची आवश्यकता होती. मात्र त्यांनी याच षटकात अनेक विकेट्स गमावल्या. त्याचाच फटका त्यांना या दोन्ही सामन्यात बसला. अखेर दोन्ही सामन्यात त्यांना सुपर ओव्हरमध्ये पराभूत व्हावे लागले.
तिसऱ्या टी20 सामन्यामध्ये न्यूझीलंडसमोर भारताने 180 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज होती.
यावेळी भारताकडून मोहम्मद शमीने गोलंदाजी करत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रॉस टेलरने षटकार मारला. त्याच्या पुढच्या चेंडूवर एकेरी धाव निघाली. त्यामुळे न्यूझीलंडसमोर 2 धावा 4 चेंडू असे समीकरण होते.
पण याचवेळी शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत केन विलियम्सनला तिसऱ्या चेंडूवर 95 धावांवर असताना बाद केले. तर पुढच्या दोन चेंडूत 1 धाव शमीने दिली आणि शेवटच्या चेंडूवर टेलरला त्रिफळाचीत केले. त्यामुळे न्यूझीलंडलाही निर्धारित 20 षटकात 6 बाद 179 धावा करता आल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
तसेच चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी केवळ 7 धावांची आवश्यकता होती. यावेळी भारताकडून शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होता. त्याने पहिल्याच चेंडूवर रॉस टेलरला 24 धावांवर बाद केले. त्याच्या पुढच्या चेंडूवर डॅरिल मिशेलने चौकार मारला. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी 4 चेंडूत 3 धावा असे समीकरण झाले होते.
मात्र तिसऱ्या चेंडूवर 57 धावांवर खेळत असलेला टीम सिफर्ट एकेरी धाव काढण्याच्या नादात धावबाद झाला. त्याच्या पुढच्या चेंडूवर मिशेल सँटेनरने 1 धाव काढली. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 2 चेंडूत 2 धावा हव्या होत्या.
मात्र पुन्हा एकदा न्यूझीलंडने 5 व्या चेंडूवर डॅरिल मिशेलची विकेट गमावली. तर त्याच्या पुढच्या चेंडूवर एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी धावताना सँटेनर धावबाद झाला. त्यामुळे या सामन्यातही बरोबरी झाली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
…म्हणून सुपर ओव्हरमध्ये केएल राहुलसह विराट कोहली आला फलंदाजीला
वाचा????https://t.co/E6OksdCXMX????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) January 31, 2020
विराटने भन्नाट थ्रो करत कॉलिन मुन्रोला केले धावबाद, पहा व्हिडिओ https://t.co/CZyuFVjBO5#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @imVkohli
— Maha Sports (@Maha_Sports) January 31, 2020






