मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) मॅकलीन पार्क, नेपियर येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनी धमाकेदार खेळी साकारली आणि आपले अर्धशतक साकारले. ते दोन खेळाडू म्हणजेच डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स होय. मात्र, भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर दबाव आणला. या दोघांच्या जोरावर न्यूझीलंडला दीडशे धावांचा आकडा पार करता आला. हा सामना न्यूझीलंडसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण, यापूर्वी झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे भारत या मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय न्यूझीलंडच्या फलंदाजांनी प्राथमिकरीत्या योग्य सिद्ध ठरवला. यावेळी न्यूझीलंडने फलंदाजी करताना सर्वच्या सर्व 10 विकेट्स गमावत 160 धावा चोपल्या. तसेच, भारताला 161 धावांचे आव्हान दिले.
🇳🇿 130/2 ➡ 160 all out
India pull it back brilliantly in Napier 🙌
Watch the #NZvIND T20I series LIVE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺
📝 Scorecard: https://t.co/UAVgFPPafs pic.twitter.com/anlMBpTaXk
— ICC (@ICC) November 22, 2022
न्यूझीलंडचा डाव
न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना सलामीवीर डेवॉन कॉनवे याने सर्वाधिक धावा चोपल्या. यावेळी त्याने 49 चेंडूत 59 धावा केल्या. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 5 चौकारांचीही बरसात केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 120.41 इतका होता. त्याच्याव्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स यानेही 33 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 54 धावा चोपल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मार्क चॅम्पमनने 12, डॅरिल मिचेलने 10 आणि मिचेल सँटनरने 1 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
भारताची जबरदस्त गोलंदाजी
यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना दोनच गोलंदाज तुफान गाजले. यामध्ये अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. दोघांनीही प्रत्येकी 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. अर्शदीपने 4 षटकात 37 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच, सिराजने 4 षटकात 17 धावा देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच, हर्षल पटेल याने 1 विकेट घेतली.
भारतीय संघाला ही मालिका नावावर करायची असेल, तर हा सामना जिंकावा लागणार आहे. (New Zealand all out in 160 runs india needs to 161 runs for win)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीचा जबरा फॅन किवी ओपनर! म्हणाला, ‘सूर्यासारखा फलंदाज…’
इंग्लंडने काढले पाकिस्तानचे वाभाडे! कसोटी मालिकेसाठी ‘पर्सनल शेफ’ला घेऊन जाणार सोबत