न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने आयपीएल २०२२ मध्ये त्याच्या देशातील खेळाडूंच्या सहभागाविषयी सर्व चित्र स्पष्ट केले आहे. शुक्रवारी (११ मार्च) क्रिकेट न्यूझीलंडने घोषणा केली ते नेदरलंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी असा संघ तयार करणार आहेत, ज्यामध्ये आयपीएलमध्ये सहभाग घेणारे खेळाडू नसतील. बोर्डच्या या घोषणेनंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की, न्यूझीलंडचे खेळाडू आयपीएल २०२२ मध्ये पहिल्या सामन्यापासून खेळताना दिसणार आहेत.
न्यूझीलंड संघाला २६ मार्च रोजी नेदरलंडविरुद्ध एकमात्र टी-२० सामना खेळायचा आहे. त्याच दिवशी आयपीएल २०२२ हंगामही सुरू होईल. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डकडून त्याच्या या आगामी मालिकेविषयी स्पष्टीकरण दिले जाण्यापूर्वी खेळाडूंच्या आयपीएल सहभागाबाबत संभ्रम कायम होता. पण आता चित्र स्पष्ट झाले आहे. टी-२० सामना झाल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २९ मार्चला सुरू होईल आणि ४ एप्रिलला संपेल.
बोर्डने खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभाग घेण्याचा रस्ता मोकळा केल्यानंतर केन विलियम्सन, ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदीसह १२ खेळाडू २६ मार्चपूर्वी त्यांच्या आयपीएल फ्रेंचायजीसोबत सामील होतील. पुढच्या आठवड्यात न्यूझीलंडचे सर्व १२ खेळाडू जे आयपीएमध्ये खेळणार आहेत, ते भारतासाठी रवाना होतील. स्वतःच्या आयपीएल संघाच्या कॅम्पमध्ये सहभागी होऊन त्यांना त्याठिकाणी सरावही करावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंगाज लॉकी फर्ग्युसन चालू आठवड्यात त्याच्या आयपीएल फ्रेंचायझीसोबत जोडला जाईल. तसेच डेवोन कॉनवे आणि डेरिल मिसेळ १५ मार्चपर्यंत याठिकाणी पोहोच होतील. दक्षिण अफ्रिकी खेळाडूंचा विचार केला, तर त्यांचे मुख्य खेळाडू बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहेत. त्यामुळे त्यांचे आठ प्रमुख खेळाडू आयपीएलचे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाहीत. यासंदर्भात बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण अफ्रिका यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. जर चर्चेतून मार्ग निघाला, तर अफ्रिकी दिग्गज खेळाडूही आयपीएलच्या सुरुवातीपासून खेळण्यासाठी उपलब्ध राहू शकतात.
आयपीएल २०२२ मध्ये खेळणार न्यूझीलंडचे खेळाडू –
केन विलियमसन (हैदराबाद), लॉकी फग्र्यूसन (गुजरात), ट्रेंट बोल्ट (राजस्थान), एडम मिल्ने (चेन्नई), मिशेल सेंटनर (चेन्नई), टिम साउथी (कोलकाता), जेम्स नीशम (राजस्थान), ग्लेन फिलिप्स (हैदराबाद), डेवोन कॉनवे (चेन्नई), फिन एलन (बेंगलुरु), टिम सेफर्ट (दिल्ली), डेरिल मिशेल (राजस्थान)
महत्वाच्या बातम्या –
हरमनप्रीत कौरचा वेस्ट इंडिजला दे दणादण, विश्वचषक सामन्यात शतक झळकावत बनली अव्वल
हरमनप्रीतचा मोठा पराक्रम! १०९ धावांची खेळी करताच विश्वचषकात अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय