विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अवघे २ दिवस शिल्लक आहेत. भारत आणि न्यूझीलंड संघांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून दोन्ही संघ कसून सराव करताना दिसत आहेत. न्यूझीलंड संघाने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळून चांगला सराव केला आहे. तर, त्याउलट भारतीय संघाला सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. दरम्यान, कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी न्यूझीलंड संघाकडून विलागीकरणाचा नियम मोडण्यात आल्याचा दावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)ने केला आहे.
बीसीसीआयने नुकताच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी १५ खेळाडूंचा संघ घोषित केला आहे. परंतु, त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आईसीसी) द्वारे लागू केलेल्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
झाले असे की, न्यूझीलंड संघाचे ६ खेळाडू ‘गोल्फ कोर्स’वर गेल्याचे दिसून आले. हा प्रकार जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमाच्या बाहेरचा आहे. न्यूझीलंडच्या त्या ६ खेळाडूंमध्ये ट्रेंट बोल्ट, टिम साउथी, हेनरी निकोल्स, मिशेल सेंटनर, डेरी मिशेल आणि फिजियो टॉय सिमसेक हे होते.
भारतीय संघातील खेळाडू आणि त्यांचा कुटंबांना सांगण्यात आले आहे की, तुम्ही हॉटेल सोडून इतर कुठल्याही ठिकाणी जाऊ शकत नाहीत. परंतु, जेव्हा भारतीय संघास कळले की, न्यूझीलंड संघाचे ६ खेळाडू बाहेर गोल्फ खेळण्यास गोल्फ कोर्सवर गेले आहेत. तर, भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने आईसीसीकडे तक्रार केली आहे की, जर नियम असतील तर ते दोन्ही संघासाठी सारखेच असयला हवे.
यावर उत्तर देताना आईसीसीने सांगितले की, “कोणत्याही जैव सुरक्षित वातावरणचे उल्लंघन झालेले नाही. गोल्फ कोर्सचा भाग हा सुद्धा जैव सुरक्षित वातावरणात येतो. तसेच भारतीय संघाने आपले विलगीकरण कालावधी पूर्ण केलेला आहे. त्यामुळे भारतीय संघ आणि त्यांचे कुटुंब जवळपासच्या ठिकाणी फिरू शकतात.”
न्यूझीलंड संघाचा विचार करायचा झाल्यास, त्यांनी इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळण्यापुर्वी आणि खेळताना त्यांना जैव सुरक्षित वातावरणामध्येच ठेवले गेले होते. त्यामुळे न्यूझीलंडचे खेळाडू कोरोनापासून सुरक्षित आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
धवनचा संघ चिंतेत, श्रीलंका बोर्डाकडून भारतीय संघाच्या ‘या’ महत्त्वाच्या मागणीस नकार
गावसकर-कार्तिकसह ‘या’ दिग्गजांचे समालोचन वाढवणार WTC फायनलची रंगत, पाहा संपूर्ण यादी
सराव आणि तोही टॉसचा! इंग्लिश कर्णधाराचा व्हिडिओ होतोय व्हायरल