भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला (16 ऑक्टोबर) पासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी बेंगळुरूच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वीच न्यूझीलंड कर्णधार ‘टाॅम लॅथम’ने (Tom Latham) मोठे वक्तव्य केले आहे.
पहिल्या सामन्याआधीच लॅथमने पत्रकारांना सांगितले की, “या स्थितीत तुम्ही नक्कीच फिरकीपटूंकडे बघता, पण बांगलादेशविरुद्धचे शेवटचे काही सामने खेळलेल्या बुमराह, सिराज, आकाश दीप यांच्या उपस्थितीने भारताची वेगवान गोलंदाजी मजबूत झाली आहे. म्हणून त्यांचा संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे. फलंदाजीच्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे बरेच सामने जिंकणारे खेळाडू आहेत, जे तुमच्यापासून खूप लवकर सामना काढून घेऊ शकतात.”
पुढे बोलताना लॅथम म्हणाला, “आम्ही या आव्हानाची वाट पाहत आहोत, आशा आहे की गेल्या काही दौऱ्यांमधून मिळालेल्या अनुभवाचा आम्ही फायदा घेऊ शिकू. पण या सामन्यात माजी कर्णधार केन विल्यमसनची उणीव भासणार आहे, जो कंबरेच्या दुखापतीमुळे दौऱ्याच्या सुरुवातीलाच बाहेर पडला होता. विल्यमसन नाही हे निराशाजनक आहे. तो शक्य तितक्या लवकर तयार होईल अशी आशा करूया.”
लॅथम म्हणाला, “केनसारख्या वरिष्ठ खेळाडूला गमावणे निराशाजनक आहे, पण त्यामुळे इतर खेळाडूंना जबाबदारी घेण्याची संधी मिळते. बेन सियर्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे खराब फॉर्मशी झगडत असलेला वेगवान गोलंदाज टीम साऊदीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.”
महत्त्वाच्या बातम्या-
जामनगरचा वारस झाला भारताचा ‘हा’ माजी खेळाडू! संपत्तीच्या बाबतीत कोहलीला टाकलं मागे
IND vs NZ; कसोटी मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का! स्टार खेळाडूच्या खेळण्यावर सस्पेन्स
PAK vs ENG; बाबर आझमचे पुनरागमनाचे दरवाजे बंद? बदली खेळाडूने ठोकले शानदार शतक